Headlines

अशा प्रकारे मुकेश खन्ना यांना मिळाला होता महाभारत मालिकेत भिष्मचा रोल !

टिव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता मुकेश खन्ना यांनी अनेक बॉलिवुड चित्रपटांत अभिनय केला आहे. मात्र छोट्या पडद्यावरील २ रोल्स मुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्यातील पहिला म्हणजे महाभारत मालिकेतील भीष्म पितामह ही भूमिका आणि दुसरी म्हणजे शक्तिमान. सध्या लॉक डाऊन च्या कारणामुळे प्रेक्षक मुकेश खन्ना यांच्या दोन्ही भूमिका टिव्हीवर पुन्हा बघू शकत आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का महाभारतातील भीष्म पितामह ही भूमिका त्यांना सहज मिळाली नव्हती. त्यांना अर्जुनाची भूमिका करण्याची इच्छा होती मात्र मुकेश यांचे म्हणने आहे की काही गोष्टी या देवाने ठरवलेल्या असतात. माझ्या बाबतीत ही देवाने काही गोष्टी ठरलेल्या त्यातीलच एक म्हणजे भीष्म पितामह ही भूमिका.
कॉमेडियन पेनटल यांचे भाऊ गुफी पेनटल यांनी महाभारत मालिकेत शकुनी मामा ची भूमिका केली होती याशिवाय ते महाभारत मालिकेचे कास्टींग डायरेक्टर सुद्धा होते. गुफी यांनी सर्वात आधी मुकेश खन्ना यांना फोन करून बोलवून घेतले. या आधी गुफी यांनी मुकेश यांच्यासोबत एका जाहिरातीत काम केले होते.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !मुकेश यांनी त्यांना कोणती भूमिका दिली जाऊ शकते याची विचारणा केली . त्यावेळी गुफी यांनी अर्जुन, कर्ण, कृष्ण आणि भीष्म ही ४ नावे सांगितली. त्यानंतर मुकेश यांनी ऑडिशन साठी होकार कळवला. मुकेश यांना अर्जुन किंवा कर्ण यातील एक भूमिका हवी होती. १५ चित्रपटांत काम करून सुद्धा मुकेश यांनी गेटअप मध्ये येऊन ऑडिशन दिली होती. काही वेळाने त्यांना गुफी यांचा फोन आला व ते म्हणाले की तू दुर्योधनाची भूमिका करावीस अशी बी आर चोपडा यांची ईच्छा आहे.

हे वाचा – रामायण मधील सीता आत्ता काय करते बघा, आणि पहा तिचे आत्ताचे फोटोज !मात्र मुकेश यांनी या भूमिकेस साफ नकार दिला. ते म्हणाले माझ्या अभिनयातून खलनायकी भूमिका साकारली जाऊच शकत नाही. आज देखील मुकेश यांचे म्हणणे आहे की त्यांची कास्टींग ही ना बी आर चोपडा यांनी केली किंवा ना गुफी यांनी. ती माझ्या नशिबाने केली होती. मुकेश यांना अर्जुन ही भूमिका करायची होती पण राही मासूम रजा जे महाभारत मालिकेचे पटकथाकार होते त्यांना दुसऱ्याच व्यक्तीत अर्जुनाची प्रतिमा दिसली आणि त्यांनी ती त्या व्यक्तीस दिली.

हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !
कर्ण ही भूमिका सुद्धा अशाच प्रकारे हातातून गेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गुफी यांनी फोन करून गुरु द्रोणाचार्य यांची भूमिका ऑफर केली. मुकेश खन्ना यांनी लहानपणी च महाभारत वाचले होते. त्यांच्या मते महाभारतातील प्रत्येक पात्र हे आपआपल्यापरीने एखाद्या योध्याहून कमी नव्हते. त्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी होकार कळवला.
परंतु पुन्हा एकदा गुफी यांनी मुकेश यांना फोन करून बोलवून घेतले आणि तेव्हा तिथे त्यांना समजले की त्यांची निवड ही भीष्म या भूमिकेसाठी झाली आहे. आधी ही भूमिका विजेंद्र घाटके करणार होते पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही आणि ही भूमिका मुकेश खन्ना यांना मिळाली.

हे वाचा – दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *