Headlines

अरिजीत सिंह आणि नेहा कक्कड एक गाणे गायला घेतात तब्बल एवढे मानधन, वाचून थक्क व्हाल !

चित्रपटाचे संगीत हा चित्रपटाचा पाया असतो. चित्रपटामध्ये संगीत किंवा गाणे नसेल तर तो चित्रपट निर्जीव वाटतो. त्यामुळे चित्रपटांमध्ये गाण्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. काही वेळेस तर चित्रपटांमधील गाण्यांमुळे चित्रपट जास्त प्रसिद्ध होतात. सध्याचा जमाना हा उडत्या गाण्यांचा आहे. तरुणाईलाही गाणी खूप आवडतात त्यामुळे सध्याच्या नव्या फळीच्या गायकांचा कल हा अशी गाणी गाण्यास जास्त असतो.

यामध्ये बॉलीवूड ची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड आणि गायक अरिजीत सिंह अग्रेसर आहेत. हे दोन्ही गायक सध्या बॉलिवूडमध्ये टॉपचे गायक म्हणून ओळखले जातात. सध्या बॉलीवूड मध्ये या दोघांचा आवाजाचे प्रत्येक जण दिवाणे आहेत. यांची प्रसिद्धी पाहता त्यांचे मानधनही मजबूत असेल हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला नेहा कक्कड व अर्जित सिंह प्रत्येक गाण्यासाठी किती रुपये घेतात हे सांगणार आहोत.
बॉलीवूड चे टॉप ची गायिका नेहा कक्कड चा आवाज खूपच गोड आणि सुरेल आहे. तिने आयुष्यात खूप मेहनत करून बॉलीवूड मध्ये स्वतःच्या आवाजाची ओळख निर्माण केली. कित्येक वर्षांच्या अथक प्रयत्नांनी ती आता एक गायिका म्हणून स्वतःचे करिअर निभावत आहे. सर्वसामान्य आयुष्यापासून ते एक सेलिब्रिटी गायिका पर्यंतच्या प्रवासात तिला नाव व प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात मिळाली.

बॉलीवूड मध्ये तिची बरीच गाणी सुपरहिट झाली आहे. नेहा कक्कड ने तिच्या मेहनतीच्या जोरावर ३ मिलियन डॉलर म्हणजेच २४.७५ करोडो रुपयांची संपत्ती जमा केली. मीडिया रिपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार ती प्रत्येक जाण्यासाठी ८ ते १० लाख रुपये फी घेते.

तर बॉलिवूडमध्ये पुरुषांच्या आवाजात सध्या अरिजीत सिंह चा आवाज खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या आवाजातील लय व सूर ऐकून प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकतो. विशेष म्हणजे अरिजीत सिंह ला हा र्ट ब्रे क नंबर चा राजा म्हणून ओळखले जाते. कारण जेव्हा आपण त्याची गाणी ऐकतो त्यावेळेस त्या गाण्यातील प्रत्येक शब्द त्यातील सूर हा मंत्रमुग्ध करणारा असतो.
त्यामुळे संगीत क्षेत्रातील राजा असे अरिजीत सिंह ला म्हटल्यास हरकत नाही. त्याचा आवाज लाखो हृदयांना भिडतो. त्याच्या आवाजात एक विशेष प्रकारची स्वर्गीयता आहे. जी आपल्याला सतत त्या सुरांमध्ये ठरवून टाकते. गायना शिवाय अरिजीत सिंह त्याच्या समाजकार्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

तो ४५ मिनिटांच्या शोसाठी १.५ करोड रुपये फी घेतो. याशिवाय चित्रपटांमध्ये गाणी गाण्यासाठी तो प्रत्येक गाण्या पाठवली १० ते १५ लाख रुपये फी घेतो. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत त्याच्याकडे ८ मिलियन डॉलर संपत्ती आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !