Headlines

निक जोनसने पहिल्या भेटीवेळी प्रियंका चोपडाला या कारणामुळे किस करण्यास दिला नकार, जाणून घ्या !

या दोन वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची लग्न झाली. या बॉलिवूड कपलची चर्चा सतत सोशल मीडियावर होतच असते. अशीच एक सदा चर्चित जोडी म्हणजे प्रियंका चोपडा आणि तिचा नवरा निक जोनास. या दोघांच्या रोमान्सची चर्चा अनेक ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या. मात्र या विदेशी मुलाने एक दिवस प्रियंका चोपडा सोबत लग्न करून सर्वांचे तोंड बंद केले.
आज निक जोनास त्याचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला निक जोनास व प्रियांका चोपडा ची पहिली डेट कशी होती हे सांगणार आहोत. निक जोनास आणि प्रियंका चोपडा यांची लव स्टोरी २०१६ मध्ये सुरू झाली. प्रियांकाला पाहताक्षणी मी तिच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर निकने प्रियांकाला २०१७ च्या ऑस्कर सोहळ्यात पाहिले. ही संधी हातातून जाऊ नये यासाठी निकने संपुर्ण भरलेल्या हॉल समोर प्रियांका ला प्रपोज केले.
त्यानंतर प्रियांका चोपडा ने त्याचे प्रेम स्वीकारून त्याला डेट वर बोलावले होते. त्या दिवशी दोघे जण डेटवर भेटले व आपापल्या अपार्टमेंटमध्ये निघून गेले. त्यादिवशी निकने प्रियांकाला किस देखील केले नाही. या उलट त्याने प्रियंकाची पाठ थोपटली आणि निघून गेला. यानंतर महिनाभर दोघेही मेसेज माध्यमातून बोलायचे. त्यानंतर हे दोघे २०१७ मध्ये मेट गाला सोहळ्यात एकत्र गेले. त्यावेळी प्रियांकाने निकला तिच्या अपार्टमेंट मध्ये बोलावले होते मात्र तेव्हा तिची आई सोबत होती.
एका इंटरव्यू दरम्यान प्रियांकाने याबाबतीत खुलासा केला होता की अपार्टमेंटमध्ये आम्ही तासंतास गप्पा मारल्या मात्र जातेवेळी किस करण्याऐवजी त्याने माझी पाठ थोपटली. त्यामुळे मी खूप नाराज झाले होते. जेव्हा मी यासंबंधी निकशी बोलले त्यावेळी त्याने मला समजावले की तेथे तुझी आई होती त्यामुळे मी तुला किस केले नाही. मी तुझ्या आईचा खूप सन्मान करतो. निकची हीच गोष्ट माझ्या मनाला खूप भावली.
निक आणि प्रियंका चे लग्न डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरमध्ये मोठ्या धामधुमीत पार पडले. दोघांनीही एकमेकांच्या धर्माचा सन्मान करत आणि एकमेकांच्या ध र्मा चे नियम पाळत लग्न केले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !