Headlines

महाराष्ट्रात १० वी, १२वी उत्तीर्णासाठी पोस्टात रुपये २१७०० ते ६९१०० नोकरीची सुवर्ण संधी, जाणून घ्या !

कोरोना च्या काळात कित्येक जणांच्या नोकरी गेल्या, अनेकांचे उद्योग धंदे ठप्प पडले. कधीही न अनुभवलेल्या स्थिती त्या काळात अनेकांनी जवळून पहिल्या. आता थोडेफार पूर्ववत होत असताना पोस्टाने तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतीय पोस्ट खात्यात महाराष्ट्र विभागासाठी १३७१ नोकरीसाठी जागा उपब्धत केल्या आहेत. यासाठी इच्छुकांना अर्ज उपब्धत झाले असून ते अप्लाय करू शकतात.
पोस्टात उपलब्ध झालेल्या या नव्या जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी तुम्ही १० नोव्हेंबर रात्री ११:५९ पर्यंत अर्ज भरू शकता. या आधी अर्ज भरण्यासाठी ३ नोव्हेंबर ही शेवटची तारीख ठेवली होती मात्र आता ती बदलून १० नोव्हेंबर करण्यात आली आहे.

नोकरीसाठी पात्रता – पोस्टमन किंवा मे ल गार्ड या पदासाठी हे उमेदवार इच्छुक असतील त्यांच्याजवळ कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाचे १२ वी पास असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. महत्वाची बाब म्हणजे उमेदवाराची स्थानिक भाषा मराठी असावी. आणि ती त्याला उत्तम येणे गरजेचे आहे.

म ल्टी ट स्किं ग स्टाफ या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाचे १० वी पास असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तसेच त्याला मराठी भाषा येणे बं ध न कारक आहे. या पदाच्या भरती साठी आधी संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल. आणि त्यावरूनच उमेदवार निवडले जातील.

पोस्टमन आणि मे ल गार्ड या पदांसाठी निवड झालेल्या तरुणांना तीन श्रेणीत पगार दिला जाईल. हा पगार २१७०० रु. ते ६९१०० रु. दरम्यान असेल. तर मल्टी टास्किंग या पदासाठी काम करणाऱ्यांना एका श्रेणीत पगार मिळेल तो १८००० रु ते ५६९०० रु इतका असेल.

महाराष्ट्र पोस्टात पुढील प्रमाणे पदांचे वितरण असेल-
पोस्टमन या पदासाठी १०२९ जागा उपलब्ध. मल्टी टास्किंग पदासाठी ३२७ जागा उपलब्ध आहे. आणि मेल गार्ड या पदासाठी १५ जागांची भरती होणार आहे. या तीनही पदांसाठी उमेदवारांचे वय १८ ते २७ असायला हवे. ३ नोव्हेंबर २०२० पर्यंतचे वय गृहीत धरण्यात येईल.

अर्ज फी – UR/OBC/EWS या वर्गासाठी अर्ज फी ५०० रु आहे तर SC/ST/PWD या वर्गासाठी आणि महिलांसाठी अर्ज फी १०० रु आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !