कोरोना काळात सुवर्णसंधी, घरबसल्या असे मिळावा गाडीचे ऑनलाईन लर्निंग लायसन, जाणून घ्या प्रोसेस !

bollyreport
4 Min Read

आपल्याकडे कुठलेही काम असो कागदपत्र सर्वात महत्त्वाची असतात. त्यात जर ड्रायव्हिंग लायसन असेल तर ते अतिमहत्त्वाचे असते. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे वाहन चालवायचे असल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. सध्या कोरोनाव्हायरस मुळे सर्वच जण घरात आहेत किंवा घरबसल्या ऑफिसची काम करत आहेत.

ज्या व्यक्तींना गाड्या चालवायच्या आहेत मात्र त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही त्यांच्यासाठी एक नामी संधी चालुन आली आहे. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत घर बसल्या लर्निंग लायसन साठी अपलाय कसे करावे हे सांगणार आहोत.
ड्रायव्हिंग चे लर्निंग लायसन काढण्यासाठी तुमच्या ब्लड ग्रुप चा रिपोर्ट, तुमचा पासपोर्ट साईज फोटो, जन्मदाखला आणि दहावीचे सर्टिफिकेट महत्त्वाचे असते.

याव्यतिरिक्त तुमच्याकडे आधार कार्ड, वोटर आयडी, रेशनिंग कार्ड, इलेक्ट्रिसिटी किंवा पाण्याचे बिल यांपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर अतिउत्तम ! लॉक डाऊन मुळे आणि कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यभरातील लायसन साठी घेतल्या जाणाऱ्या टेस्ट हळू हळू सुरु आहेत. त्यामुळे लर्निंग लायसन काढणे आधी तुम्ही तुमच्या राज्याचे नियम जाणून घ्या आणि मग त्यासाठी अप्लाय करा.

अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉपच्या ब्राउझर वर https://sarathi.parivahan.gov.in/ या लिंक ला ओपन करा. त्यानंतर तुम्ही कुठल्या राज्यात राहता त्या राज्यावर क्लिक करा. त्यानंतर डाव्या बाजूला न्यू लर्नर लायसन या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर नियम व अटी दिलेल्या असतील त्या वाचून कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल या पेजवर सबमिट या ऑप्शन वर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर लायसन च्या दृष्टिकोनातून आवश्यक असे पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला आरटीओ ऑफिस पासून ते तुमचे नाव, ब्लड ग्रुप, तुमच्या घराचा पत्ता, तुमचे जन्मस्थळ, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ओळखीसाठी तुमच्या शरीरावरील एखादी खूण यांसारखी माहिती विचारली जाईल. तसेच काही कागदपत्रे अपलोड करायला सांगतील ते अपलोड करा. त्यानंतर तुम्ही कुठल्या गाडीसाठी लायसन तयार करून घेऊ इच्छिता असे विचारण्यात येईल.

यानंतर, अर्ज फी सबमिट करा आणि अर्ज क्रमांक नोंद करून ठेवा. यानंतर तुम्हाला लायसन साठी च्या परीक्षेसाठी तारीख मिळेल आणि यात तुम्ही यशस्वी झाल्यास तुमचे लर्निंग लायसन तयार होईल. पूर्ण गाडी शिकल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसनसाठी अर्ज करावा लागेल.

सध्या आरटीओमध्ये परीक्षा देण्यासाठी जाण्याची गरज नाही – आपणास लर्निंग लायसन्स मिळवायचे असेल तर आपणास परीक्षेच्या प्रक्रियेतून जावे लागते. परंतु कोरोना काळात परिवहन मंत्रालयाने यातून दिलासा दिला असून, आरटीओमध्ये जाऊन चाचणी देण्याची अत्यावश्यकता दूर केली आहे. आता अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ट्युटोरियलद्वारे घरी बसूनच त्यांना यासाठी मदत मिळू शकेल.

कालबाह्य कागदपत्रे 30 जूनपर्यंत वैध मानली जाणार – ड्रायव्हिंग लायसन्स (DL), नोंदणी प्रमाणपत्र (RC), फिटनेस प्रमाणपत्र, परमिट इत्यादी सारखी मोटार वाहन कागदपत्रे ज्या वाहनचालकांची 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य झाली, त्यांना नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिलासा मिळाला आहे. सरकारने त्यांची वैधता मर्यादा 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत कालबाह्य कागदपत्रे जूनपर्यंत वैध मानली जातील. वाहन चालकांना कोणतेही चालान भरावे लागणार नाहीत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.