करोडो रुपयांच्या खर्चामध्ये डुबलेल्या अनिल अंबानी यांच्यावर सध्या लंडन न्यायालयात केस सुरू आहे. अनिल अंबानी यांनी चीनमधील बँकांमधून कर्ज घेतले होते आणि हे कर्ज फेडण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल अंबानी यांनी एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ चायना आणि डेव्हलपमेंट बँक ऑफ चायना यांच्याकडून ७१६ मिलीयन डॉलर म्हणजेच जवळ जवळ पाच हजार ५,२७६ करोड रुपयांचे कर्ज घेतले आहे.
याच कर्जामुळे वरील बँकांनी अनिल अंबानी यांच्यावर केस केली आहे. हे कर्ज फेडण्यासाठी लंडनच्या न्यायालयाने यांना जून महिन्यापर्यंतची मुदत दिली होती. परंतु ते यामध्ये यशस्वी ठरले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की माझ्याकडे आता काहीच उरले नाही आहे आणि ते त्यांच्या वकिलांची फी देखील दागिने विकून देत आहेत. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे अनिल अंबानी मुंबईत ज्या घरात राहतात ते घर चक्क ५ हजार करोड पेक्षा जास्त किमतीचे आहे.
त्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा देखील त्यांच्या घराची किंमत जास्त आहे. या घरांमध्ये अनिल अंबानी यांच्या समवेत त्यांची पत्नी टीना मुनीम आणि त्यांची दोन मुले अनमोल व अंशुल अंबानी राहतात. धीरूभाई अंबानी या उद्योग समुहाचे चेअरमन असलेल्या अनिल अंबानी यांनी खुपच शानदार आणि मनमोहक असे घर बनवले आहे.
२०१८ मध्ये फायनान्शियल सर्व्हिस कंपनीने अनिल अंबानी त्यांचे घर भारतातील महाग घरांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर दर्शवले होते. तर त्यांचा भाऊ मुकेश अंबानी यांचे घर पहिल्या स्थानावर दर्शवले होते. अनिल अंबानी यांच्या घरातील ज्या वस्तू आहेत त्यांची किंमत तब्बल करोडोंच्या घरात आहे.
अनिल अंबानी यांनी विदेशी इंटेरियर डिझायनर्सच्या मदतीने आपले घर सजवले आहे. अनिल अंबानी यांचा बंगला मुंबईतील पाली हिल त्या परिसरामध्ये आहे. त्यांचा घर Abode 1600 स्क्वेअर फिट मध्ये बनवलं आहे. सोबतच्या घरामध्ये व्यायामशाळा, स्विमिंग पूल इत्यादी व यासारख्या अनेक सोयीसुविधा या घरामध्ये उपलब्ध आहेत.
अनिल अंबानी यांनी आपल्या घराच्या छतावर हेलिपॅड बनवून घेतले आहे. या घराची उंची ते अजून वाढवू इच्छित आहे असे ऐकण्यात देखील आले आहे. परंतु असे करण्यासाठी त्यांना अधिकृतरित्या मान्यता मिळाली नाही. त्यांच्या घरात अनेक हॉल आहेत आणि हे हॉल खूप सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीने सजवले आहेत.
अनिल अंबानी त्यांच्या घरातील वस्तू जितक्या महाग आहेत इतक्यात त्या त्याच पद्धतीने अबाधित राखण्यासाठी देखील खूप खर्च येतो. त्यांच्या घरात नोकर-चाकर देखील खुप आहेत मनी प्रत्येक महिन्याला यांच्या पगारामध्ये लाख रुपये खर्च होतात. अनिल अंबानी यांच्या घराचे बिल तब्बल ६० लाख रुपये इतके येत असल्याचे देखील म्हटले जाते.
लंडन न्यायालयामध्ये जेव्हा त्यांच्या घराच्या घरच्या बद्दल बोलले गेले, तेव्हा अनिल अंबानी यांनी सांगितलं की, त्यांच्या घरचा सगळा खर्च ही त्यांची पत्नी करत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !