बॉलिवूडचा खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सर्वच गोष्टींमुळे चर्चेत असतो. संपूर्ण वर्षभरात त्याचे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. त्याच्या सोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. अक्षय कुमार सध्या त्याचा येणारा पुढील चित्रपट अतरंगीच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
या चित्रपटात त्याच्या सोबत सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची लेक सारा अली खान व साऊथ कडील सुपरस्टार धनुष दिसणार आहे. हे तिघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. आज देखील अनेक कलाकार अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान यांच्या सोबत काम करण्यासाठी तरसत असतात.
अक्षय कुमार व शाहरुखला ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शाहरुख खान ला अक्षय कुमार सोबत काम करणार का म्हणून विचारले गेले यावेळी शाहरुख खानने सांगितले की मी अक्षय सोबत काम करू शकत नाही कारण तो सकाळी लवकर उठतो आणि मी सकाळी झोपायला जातो. असे असेल तर आमचा ताळमेळ कसा जमेल?
याबाबत जेव्हा अक्षय कुमारला सांगितले गेले की शाहरुख खानने तुमच्या वेळापत्रकामुळे तुझ्यासोबत काम करण्यास नकार दिला. यावर अक्षय कुमार म्हणाला की, तस पाहिलं तर दोन अभिनेत्यासोबत सोलो काम हे खूप जास्त असतं. आणि चित्रपटांमध्ये दोन मुख्य अभिनेत्यांचे एकत्र असे कमी शुट असते.
माझ्या माहितीप्रमाणे मी सलमान खान सोबत एकत्र ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यावेळी सलमान खान त्याची एक्सरसाईज करून सेटवर ११ वाचता यायचा आणि सेटवर ७ वाजताच पोहोचून शुट सुरू करायचो. त्यावेळी डेव्हिड धवनने खूप चांगली प्लानिंग केली होती.
ते माझ्यासोबत सकाळी सात वाजता काम सुरु करायचे. ११ वाजता सलमान खान यायचा त्यानंतर आम्ही दोघे २-२:३० वाजेपर्यंत काम करायचो. दोन नंतर मी निघून जायचो. मग सलमान खान २ ते रात्री १० वाजेपर्यंत काम करायचा. हा चित्रपट ३२ दिवसात चित्रित करून झाला होता.
त्यामुळे आपण असे देखील करू शकतो. हा शाहरुख खान सोबत काम करण्याचा एक चांगला पर्याय आहे. अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा लक्ष्मी बॉ*म्ब हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. शिवाय काही दिवसांपूर्वीच तो बियर गिल्स सोबत मॅन वर्सेस वाइल्डच्या एका एपिसोड मध्ये दिसला होता.
तुम्हाला अक्षय कुमार आणि शाहरुख खानला एकत्र चित्रपटांमध्ये पाहायचे आहे का? तुमचे उत्तर कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !