असे म्हटले जाते की प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी प्रेमात नक्कीच पडतो आणि प्रत्येक जण त्यांचे पहिले प्रेम नेहमीच लक्षात ठेवते. मग भलेही ती व्यक्ती त्यांच्या पहिल्या प्रेमापासून दूर जरी झाली असली तरी कुठे न कुठे आठवणी या जाग्या असतात.
बॉलीवूड मध्ये सुद्धा असे अनेक स्टार आहेत ज्यांना प्रसिद्धी मिळण्याआधीच त्यांचे पहिले प्रेम मिळाले होते. मात्र नंतर जसजशी या कलाकारांना बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळत गेली तसतसे यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमाला दूर केले. चला तर मग जाणून घेऊ या यादीत कोणकोणते कलाकार सहभागी आहेत.
बॉलीवूडची म स्ता नी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण २०१८ मध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सोबत लग्न केले. यादी दीपिकाचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते मात्र या सर्व प्रकाराची सुरुवात निहार पांड्या सोबत झाली होती. दीपिका तिच्या स्ट्रगलच्या काळात मॉडेल आणि अभिनेता असलेल्या निहार पांड्याला डेट करत होती.
मुंबईमध्ये स्वतःचे करिअर घडवण्यासाठी आलेल्या दीपिकाची ओळख निहार सोबत झाली आणि त्यानंतर दोघांचे अ फे अ र सुरू झाले. निहार सोबत दीपिका खूप काळासाठी लि व्ह इ न मध्ये राहिली होती. मात्र २००७ मध्ये आलेल्या शाहरुख सोबतच्या ओ म शां ती ओ म या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाल्यानंतर ती निहार पासून दूर झाली.
1.प्रियांका चोपडा – बॉलिवूड आणि हॉलिवूड ची देसी गर्ल प्रियंका चोपडा ने सुद्धा लग्न करून स्वतःचा संसार थाटला आहे. मात्र एकेकाळी प्रियंका मॉडेल असीम मर्चेंट ची गर्लफ्रेंड म्हणून ओळखले जायची. मॉडेलिंगच्या दिवसात प्रियंका चोपडा अशी असीमला डेट करत होती. त्यानंतर मिस वर्ल्ड हे टायटल जिंकल्यानंतर प्रियांकाने असीम सोबत ब्रेकअप केला.
असीम प्रियंकाला घेऊन एक चित्रपट दिग्दर्शित करू इच्छित होता मात्र प्रियांकाने ली ग ल नोटीस पाठवून हा चित्रपट बंद करण्यास लावला. प्रियांकाचे असीम मर्चेंट पासून ते शाहिद कपूर पर्यंत अनेक लोकांसोबत अ फे अ र होते मात्र ते अफेअर जास्त दिवस टिकले नाहीत.
2. अनुष्का शर्मा – या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली च्या बायकोचे म्हणजेच अनुष्का शर्माचे नाव सुद्धा सहभागी आहे. सध्या जरी तिने तिचा संसार थाटला असला तरी ही बॉलीवुडमध्ये येण्याआधी जोहब युसुफ हा अनुष्का चा बॉयफ्रेंड होता. अनुष्का सारखाच जोहब हासुद्धा मॉडेल होता. या दोघांची लव स्टोरी कधीच कोणापासून लपली नाही.
दोघेही एकसाथ मुंबईमध्ये आले त्यानंतर दोन वर्षे एकत्र राहत होते. त्यानंतर अनुष्काला रबने बना दी जोडी या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये सफलता मिळत गेल्यावर अनुष्काने जोहबला सोडून दिले.
3. ऐश्वर्या राय-बच्चन – जेव्हा-केव्हा बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रायचे नाव समोर येते तेव्हा लोक आपसूकच सलमान खान ला सुद्धा आठवतात. मात्र सलमान खानच्या आधी ऐश्वर्याच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती होती. मॉडेलिंगच्या दिवसात ऐश्वर्या राजीव मुलचंदानी ला डेट करत होती. मात्र नंतर जसजशी ऐश्वर्या यशाच्या जवळ गेले तशी ती राजीव पासून दूर होत गेली. आजच्या काळात ऐश्वर्या देशातील सुप्रसिद्ध कुटुंबाची सून आहे.
4. कंगना रनौत – बॉलिवूड क्वीन कंगना आज सुद्धा फिल्म जगतावर राज्य करत आहे. तिच्या आयुष्यात एक काळ असाही होता ज्यावेळी चित्रपटांमध्ये येण्यासाठी तिने तिच्या कुटुंबाला सोडले होते. फिल्मी करिअरच्या सुरुवातीला कंगना शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सोबत रिलेशन मध्ये होती. मात्र नंतर जसजशी कंगणाला प्रसिद्धी मिळत गेली तसे तिने अध्ययन ला सोडले.
5. अर्जुन कपूर – एक काळ असा होता जेव्हा अभिनेता अर्जुन कपूर सलमान खानची बहिण अर्पिता खान ला डेट करत होता. २०१२ मध्ये चित्रपटात येण्यापूर्वी अर्जुन सलमान खान च्या बहिणीला म्हणजेच अर्पिता खान ला डेट करत होता. त्यावेळी यांचे नाते खूप सिरीअस होते. अर्पिता आणि अर्जुन दोन वर्षे एकमेकांसोबत रिलेशन मध्ये होते.
अर्जुन कित्येकदा अर्पिताला त्याचे पहिले प्रेम म्हणतो. ज्यावेळी अर्जुन अठरा वर्षांचा होता व त्याचे वजन तब्बल एकशे चाळीस किलो होते त्यावेळ पासून अर्जुन अर्पिताला डेट करत होता. मात्र सध्या अर्जुन सलमान खानची एक्स वहिनी मलाइकाला डेट करत आहे.
6. आलिया भट – बॉलीवुड चुलबुली अभिनेत्री आलिया भट चे नाव तसे पाहायला गेले तर अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. मात्र बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी ती तिचा बालपणीचा मित्र अली दादरकर ला डेट करत होती. मात्र आलियाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाल्यानंतर या दोघांची जोडी कायमची तुटली. आजच्या काळात आलिया अभिनेता रणबीर कपूर ची गर्लफ्रेंड आहे.
7. रणबीर कपूर – ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा अभिनेता रणबीर कपूर हा एक हिरो म्हणून नावारूपास आला नव्हता व तो लाईम लाईट पासून दूर होता. त्यावेळी रणबीरचे अ फे अ र अभिनेत्री अवंतिका मलिक सोबत होते. हे दोघे पाच वर्षे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते मात्र यांची गोष्ट जमली नाही.
रणबीर अवंतिका चा इतका दीवाना होता की तो अनेकदा अवंतिका चा जस्ट मोहब्बत या शोचा सेट वर जायचा. अवंतिका आता अभिनेता इम्रान खानची पत्नी असून तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अशी खबर आली होती की अवंतिका आणि इमरान वेगळे होत आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !