Headlines

सरोज खान यांनी सुशांत सिंग राजपूतसाठी शेवटची पोस्ट… वाचून तुम्हीपण भा व नि क व्हाल !

चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध व पहिल्या महिला नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे मुंबई ७१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे नि ध न झाले. सरोज खान या बर्‍याच दिवसांपासून आजारी होत्या. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याना बांद्रा मधील एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. परंतु ३ जुलै रोजी रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली व मध्यरात्री १ वाजून ५२ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली होती परंतु ती निगेटिव आली.
वयाच्या तिसऱ्या वर्षी सरोज खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम केले आणि त्यानंतर त्यांनी पार्श्वभूमितील नर्तिका म्हणून काम केले. खान यांनी सन १९७४मध्ये त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून गीता मेरा नाम या चित्रपटासाठी काम केले होते. खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत सुमारे पाच दशके नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले. श्रीदेवीपासून माधुरी दीक्षितपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींना त्यांनी दिग्दर्शन केले. श्रीदेवीचे ‘हवा हवाई…’ आणि माधुरी दीक्षितचे ‘‘धक धक करने लगा‘’ या गाण्यातील नृत्यांना खान यांचे दिग्दर्शन होते. ही गाणी आणि त्या गाण्यांतील नृत्ये आजही लोकप्रिय आहेत.

सरोज खान यांनी सुशांत सिंग राजपूत आ*त्म*ह*त्या विषयक शेवटची पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती. सुशांतच्या झालेल्या आकस्मिक नि ध ना बद्दल खान यांनी शोक व्यक्त करत इंस्टाग्राम एक भावनिक पोस्ट केली होती. १४ जुनला त्यांनी शेअर केलेला इंस्टाग्राम पोस्ट मध्ये सुशांत चा एक फोटो आणि एक कॅप्शन दिले होते. सरोज खान यांनी इंस्टाग्राम वर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते, मी कधीच सुशांत सोबत काम केले नाही, परंतु आम्ही अनेकदा भेटलो आहोत. तुझ्या आयुष्यात असं काय चुकीचं काय घडलं? मी हा विचार करून हैराण आहे की तू तुझ्या जीवनात इतके कठोर पाऊल उचलले. तू कोणत्याही मोठ्या व्यक्तीसोबत बोलू शकत होतास, ज्यांनी तुला मदत केली असती आणि आम्हाला खुश बघू इच्छित होता. देव तुझ्या आ त्म्या ला शांती देवो.
मला नाही माहीत की सुशांतने उचलेल्या या पावलामुळे त्याचे वडिल आणि बहीण यांच्यावर कसा परिणाम झाला असेल. पुढे सरोज जी म्हणाल्या, त्यांनी सुशांतच्या सर्व चित्रपटांवर प्रेम केले आहे. नेहमी सुशांतवर प्रेम करत राहू, तू नेहमी आमच्या आठवणीत राहशील.
सरोज जी यांच्या नि ध ना मुळे चित्रपट सृष्टीला फार मोठा धक्का बसला आहे. खान यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे २०००हून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या माधुरी दीक्षितच्या कलंक चित्रपटातील ‘त बा ह हो गये…’ या गाण्याचे केलेले नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांचे अखेरचे होते.
खान यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत मिस्टर इंडिया (१९८७) चित्रपटातील ‘हवा हवाई…‘, तेजाब चित्रपटातील (१९८८) ‘एक दो तीन…’, बेटा चित्रपटातील (१९९२) ‘धक धक करने लगा…‘ आणि देवदास चित्रपटातील (२००२) चित्रपटातील ‘‘डोला रे डोला’‘ आदींचा समावेश होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Tags – sushant rajput saroj khan post