Headlines

या गावातील प्रत्येक व्यक्तीने केले आहे बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम, गावाची कहाणी वाचून थक्क व्हाल !

भारतात अनेक खेडीपाडी आहे शहरे आहेत आणि गावे सुद्धा आहेत. यामध्ये प्रत्येक शहराची, खेड्यांची किंवा गावांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका गावाबद्दल माहिती देणार आहोत जी वाचल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. या गावच्या मातीत एक अशी जादू आहे ज्यामुळे या गावातील प्रत्येक व्यक्ती एक अभिनेता किंवा अभिनेत्री आहे. या गावातील प्रत्येक सदस्यांनी बॉलिवूड मधील चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहेत.
या गावांमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या चित्रपट, अल्बम किंवा जाहिरातींचे चित्रीकरण होत असते. हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटाची शूटिंग सुद्धा इथेच झाली होती. या गावचे वातावरण दिग्दर्शक आणि निर्मात्यांना खूप सूट होते. त्यामुळे आता या गावातील लोकांना लाईट, कॅमेरा, ॲक्शन हे आवाज अगदी सर्वसामान्य झाले आहे.
या गावातील लोकांना रोजीरोटी येथे चालणाऱ्या शूटिंग मुळेच मिळते. या गावाला एका चित्रपटाच्या शूटिंग मुळे कमीत कमी तीस ते पस्तीस करोड रुपयांचे मिळकत प्राप्त होते. यामध्ये चित्रपटाच्या युनिटच्या राहण्याची सोय, शूटिंगचा खर्च आणि गावातील कलाकारांच्या कामाबद्दल मोबदला या सर्व गोष्टींचा खर्च सहभागी असतो.

या गावात १९८० मध्ये पहिल्यांदा चित्रपटाचे शूटिंग झाले होते. त्या चित्रपटाचे नाव गुलामी असे होते. त्यानंतर या गावात हळूहळू अनेक चित्रपटांच्या शूटिंग होऊ लागल्या. आतापर्यंत या गावात १५०० ते २००० चित्रपटांच्या शूटिंग झाल्या आहेत.
इतकी माहिती वाचल्यावर तुम्ही नक्कीच या गावचे नाव ऐकण्यास उत्सुक असाल. तर आम्ही तुमची उत्सुकता दूर करतो.
या गावाचे नाव मंडावा असे असून ते राजस्थान मध्ये आहे. राजस्थान मधील हे गाव हवेलींसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी हे गाव सगळ्यात बेस्ट लोकेशन ठरते. या गावातील घरांवर आज देखील मुघलकाळीन संस्कृतीची छाप दिसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

tags – mandwa in rajasthan