Headlines

एखादं गाणं कोणी गायला हवं आणि कोणी गाऊ नये, हे ठरवणारा सलमान खान कोण ? अभिजीत भट्टाचार्य यांचा सवाल !

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवार दिनांक १४ जून ला ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केल्यानंतर संपूर्ण बॉलीवुड इंडस्ट्री खवळली आहे. त्याच्या आ*त्म*ह*त्ये*मुळे सध्या बॉलीवूड वरील काळे पडदे उघडायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री कंगना राणावत ने सुशांत सिंह राजपूत बॉलीवूड मध्ये चालणाऱ्या ने पो टी ज्म ला बळी पडला असे आरोप करत स्टार किड्स वर निशाणा साधला. कंगना सोबतच गायक सोनू निगम सुद्धा ने पो टी ज्म वर स्वतःचे मत मांडले. आता सोनू निगम पाठोपाठ गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे सुद्धा वक्तव्य समोर आले आहे.
अभिजीत भट्टाचार्य यांनी सरळ सरळ अभिनेता सलमान खान वर निशाणा साधत आ रो प केले. सुशांतच्या मृत्यूमुळे इंडस्ट्रीमध्ये चालणाऱ्या घराणेशाहीवर वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ज्यात सोनू निगमने गायकांना सुद्धा या प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते असे म्हणत, गायक भूषण कुमार यांच्यावर आरोप केले. यावर आता अभिजीत भट्टाचार्य म्हणाले की एखादं गाणं कोणी गायला हवं आणि कोणी गाऊ नये हे ठरवणारा सलमान खान कोण?
एका वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार अभिजित यांनी संगीत क्षेत्रात एकदम खरमरीत मत व्यक्त केले. अभिजित यांनी सांगितले की, ९० च्या दशकात असे अजिबात व्हायचे नाही. पण आता मात्र याचे प्रमाण खूप वाढले आहे आणि हे खूपच दुःखजनक आहे. त्यावेळी संगीत क्षेत्राची एवढी दयनीय अवस्था नव्हती. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कंपोजर त्या चित्रपटात कोण गाणार हे ठरवायचे. पण आता काळ बदलला आहे आता काही कंपन्या किंवा त्यातील कलाकार ठरवतात या चित्रपटात गाणे कोण गाणार.
संगीत क्षेत्रात येणाऱ्या दबावावर बोलताना अभिजीत यांनी म्हटले की हा सलमान खान कोण आहे? गाणं कोण गाणार हे ठरवणारा तो कोण. कोणा गायका कडून एखादे गाणे घेऊन स्वतः हे गाणे गाणारा सलमान खान नक्की आहे तरी कोण? हा सरळ सरळ भे द भा व आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नंतर सलमान खान मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग चा शि का र झाला होता. खास करून अभिनय कश्यपने संपूर्ण खान परिवारावर आ रो प केले होते. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, सलीम खान यांची बिंग ह्यूमन ही चॅरिटी फक्त एक देखावा आहे. तसेच त्यांनी दबंगच्या शुटिंगदरम्यान चा एक किस्सा सुद्धा त्यांच्या पोस्टमध्ये शेअर केला.
काही दिवसांपूर्वी सोनू निगम नाही सांगितले होते, चित्रपट सृष्टी पेक्षा घराणेशाही सारख्या गोष्टी संगीत क्षेत्रात जास्त आहेत. आज एका अभिनेत्याचा मृत्यू झाला.
उद्या याच कारणामुळे एका गायकाचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो. किंवा यामध्ये कोणा गीतकार किंवा म्युझिक कंपोजर चा सुद्धा समावेश असू शकतो. पुढे सोनू निगम ने म्हटले की, मी नशीबवान होतो. मी खूप कमी वयात या क्षेत्रात आलो आणि या सर्व गोष्टींमधून बाहेर पडू शकलो. पण आता येणाऱ्या नव्या मुलांसाठी हे खूप कठीण आहे. सध्या अनेक तरुण येथे काम करू इच्छितात मात्र म्युझिक कंपनी हा आमचा कलाकार नाही असे म्हणून त्यांना नकार देतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !