Headlines

एकेकाळी घराणेशाहीमुळे या अभिनेत्यासाठी ‘अक्षय कुमार’ला सोडावा लागला होता हा हीट चित्रपट, अक्षय कुमारचा खुलासा !

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आ*त्म*ह*त्या केल्यानंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मवरून वाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला. अभिनेत्री कंगना राणावतने या आंदोलनाला वाचा फोडली होती. त्यानंतर अशा प्रकारच्या घराणेशाहीला बळी पडलेल्या अनेक कलाकारांनी यावर स्वतःचे मत मांडत बॉलीवूड मधील अनेक चित्रपट निर्माते आणि कलाकारांवर आरोपांचा निशाणा साधला. बॉलीवूड मध्ये चालणाऱ्या नेपोटीज्मसाठी सोशल मीडियावर सध्या करण जोहर, महेश भट, सलमान खान आणि भूषण कुमार यांना जोरदार ट्रोल केले जात आहे.
तसेच जे कलाकार बॉलिवूड मध्ये त्यांच्या आई-वडिलांमुळे आले किंवा त्यांच्या आई-वडिलांमुळे जास्त प्रसिद्ध झाले अशांना खूप खडे बोल सुनावले जात आहेत. दरम्यान सध्या अभिनेता आणि बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणाऱ्या अक्षय कुमारचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये अक्षय कुमार ने स्वतः सांगितले की तो सुद्धा एकेकाळी नेपोटीज्मचा शिकार झाला होता.
या व्हिडिओमध्ये अक्षय कुमारने सांगितले की त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात तोसुद्धा बॉलीवूड मध्ये चालणाऱ्या नेपोटीज्मला बळी पडला होता. अक्षयने सांगितले १९९१ मध्ये आलेल्या ‘फुल और काटे’ या चित्रपटातून त्याला ऐनवेळी काढून टाकले गेले. अक्षय त्याच्या व्हिडिओमध्ये म्हणतो की, फुल और काटे या चित्रपटामध्ये सुरुवातीला त्याला कास्ट केले होते. फिल्म मेकिंग च्यावेळी मी तेथे बसून असायचो.

चित्रपटात जेवढ्या गाण्यांचे चित्रीकरण झाले त्यावेळी नदीम श्रवण यांच्यासोबत मी तेथेच होतो. गाण्याची तयारी चालू होती काही लोक हार्मोनियम वाजवत होते आणि मी एके ठिकाणी बसून ते ऐकत होतो. अक्षय ने सांगितले की एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या काही फोटोशूट वेळी तसेच गावामध्ये चालणाऱ्या शूटिंगला सुद्धा मी तिथेच होतो. त्यांनी मला सांगितले की येथे रात्रीच सगळी काम संपवून बाकीची तयारी करून ठेवत आहेत कारण उद्या सकाळी शूटिंग आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मला अचानक कॉल आला आणि त्यांनी मला सांगितले की तू कामावर येऊ नकोस तुझ्या बदली दुसऱ्या एका व्यक्तीची नियुक्ती केली आहे.
फुल और काटे या चित्रपटात नंतर अजय देवगण ला घेण्यात आले होते. हा चित्रपट त्यावेळी बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला. अजय देवगन बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध स्टंटमॅन वीरू देवगन यांचा मुलगा आहे. तर अक्षय कुमारचे त्याच्याआधी या इंडस्ट्री मध्ये कोणीच नव्हते.
अक्षय कुमारने १९९१ मध्ये आलेल्या सौगंध या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी अक्षय कुमारचा खिलाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला जो बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला. यानंतरचा अक्षय कुमारचा पुढील प्रवास तर सर्वांनाच माहित आहे. कशा प्रकारे त्याने मेहनत करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले. आज अक्षय जो कोणी आहे तो फक्त आणि फक्त त्याच्या मेहनतीवर आहे. आज त्याच्या स्वकष्टामुळे त्याची गिनती इंडस्ट्रीमधील टॉप च्या अभिनेत्यांमध्ये केली जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !