Headlines

माझ्या नवऱ्याची बायको सिरीयल मध्ये पुन्हा ‘शनया’ बदलणार हि अभिनेत्री साकारणार शनया !

स्वतःच्या हिंमतीवर राधिका मसाले ही कंपनी उभी करणारी राधिका, मॉर्डन बायकांच्या प्रेमात पडणारा गुरुनाथ आणि गुरुनाथ च्या पैशांवर मजा मारणारी शनाया ही पात्रे सर्वांच्या घरातील झाली आहेत. झी मराठीवर लागणाऱ्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमधील राधिका सुभेदार, गुरुनाथ आणि शनाया ही पात्रे गेली ४ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेत राधिकाची भूमिका अभिनेत्री अनिता दाते, गुरुनाथ ची भूमिका अभिनेता अभिजित खांडकेकर आणि शनाया च्या भूमिकेत ईशा केसकर दिसत होती. ईशा केसकरने गेली दोन वर्षे शनायाची भूमिका साकारली होती.
जय मल्हार या मालिकेमधून बानू म्हणून समोर आलेल्या ईशाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत बानु पेक्षा एकदम विरुद्ध असलेली शनाया ही भूमिका साकारून प्रेक्षकांना पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडायला भाग पाडले. ईशाने जरी या मालिकेत एका व्हिलनची भूमिका साकारली असली तरी ही गोड व्हिलन सर्वांना हवीहवीशी वाटायची. मालिकेच्या सुरुवातीला ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारायची. रसिकाला सुद्धा शनाया म्हणून प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. मात्र रसिकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जायचे होते त्यामुळे तिने हा शो मध्येच सोडला होता.
त्यावेळी तिच्या जागी ईशा केसकर शनाया बनून प्रेक्षकांच्या समोर आली. सुरुवातीला रसिका आणि इशा या दोघींच्या कामांमध्ये भरपूर तुलना करण्यात आली मात्र हळूहळू ईशाने साकारलेली शनाया सुद्धा प्रेक्षकांना आवडत गेली. पण आता मात्र ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडत असल्याची बातमी समोर आली आहे.

दोन वर्षे शनाया म्हणून काम केल्यानंतर ईशाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ईशा च्या जागी शनाया म्हणून पुन्हा एकदा जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनील येणार आहे. याबाबतची माहिती स्वतः ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून दिली. ईशाने एक व्हिडिओ पोस्ट करत ती ही मालिका सोडत असल्याचे सांगितले आहे. तसेच ईशाने ही मालिका का सोडत आहे याचे कारण सुद्धा सांगितले. व्हिडिओमध्ये ईशाने सांगितले की, २९ जून ला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे चित्रीकरण तीन महिन्यानंतर पुन्हा सुरू होणार होते. यासाठी तीसुद्धा मालिकेतील इतर कलाकारांच्या सारखीच खूप उत्सुक होती.
मात्र अचानक तिची दाढ दुखून तिला ताप येऊ लागला. तसेच तिच्या दाढेचे छोटेसे ऑपरेशन सुद्धा झाले त्यामुळे ती जास्त बोलू शकत नाही. अचानक आलेल्या अडचणीमुळे ईशा मालिकेचे शूटिंग करू शकत नाही. पण तीन महिन्यांनंतर सुरू झालेले हे चित्रीकरण ईशा मुळे मध्येच थांबवता येणार नसल्यामुळे शो मस्ट गो ऑन म्हणत ईशाच्या जागी पुन्हा एकदा रसिका सुनील ला शनाया म्हणून घेण्यात आले आहे. ईशाने हा व्हिडिओ पोस्ट करताच अनेकांनी तुझी खुप आठवण येईल असे म्हणत तिला प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !