Headlines

घराणेशाही वरून तापसी पन्नू वर भडकली कंगना, म्हणाली ‘तापसी तुला लाज …

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून ला त्याच्या राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून आ*त्म*ह*त्या केली होती. त्याच्या आ*त्म*ह*त्ये बाबत अजूनही ठोस कारण पुढे आले नसले तरीही सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर अभिनेत्री कंगना राणावत ने बॉलीवूड मध्ये चालणाऱ्या नेपोटिज्म वर आवाज उठवला. याप्रकरणी कंगनाने अनेक बॉलीवूड स्टार किड्स वर आरोप केले आहेत. दरम्यान आता सोशल मिडीयावर कंगना राणावत आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यामध्ये वाद सुरू झाले आहेत. नुकताच कंगनाने अभिनेत्री तापसी पन्नूवर निशाणा साधला आहे.
कंगनाने ट्विटरवरुन तापसी वर आरोप केले आहेत. कंगनाने तिच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वरून ट्विट करत लिहिले की, इंडस्ट्रीमध्ये काही अशा व्यक्ती आहेत ज्या कंगणाने छेडलेल्या आंदोलनाला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फक्त इंडस्ट्रीमध्ये स्वतःला चांगले दाखवायचे असते. कंगनाचे वाईट गुण गायल्यावर त्यांना पारितोषिक मिळते. असे लोक आम्ही केवळ महिला होत म्हणून त्रास देतात. तापसी तुला लाज वाटली पाहिजे की तू कंगनाचा स्ट्रगल चा स्वतःसाठी फायदा करून तिच्या विरोधात उभी आहेस‌‌.
कंगनाच्या या ट्विटवर तापसी ने जरी तिला समोरून उत्तर दिले नसले तरी तिने सोशल मीडिया वर पोस्ट टाकत कंगणावर निशाणा साधला आहे. यामध्ये तापसी ने कंगना चे नाव न घेता तिला प्रत्युत्तर दिले.

तापसी ने या पोस्टमध्ये लिहिले की, मी माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी शिकली. या काही महिन्यांत तर अधिकच शिकायला मिळाले. त्यामुळे मी आता पुढे माझ्या आयुष्याला योग्य दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करीन. तापसी ने पुढे लिहिले की, ज्या व्यक्ती सगळीकडे नकारात्मकता पसरवतात अशा व्यक्तींना दुर्लक्षित करणेच योग्य ठरते. तसेच अजून एक कोट मध्ये तिने लिहिले की, वाईट लोकांबरोबर कधीही वाईट व्यवहार करू नका, याउलट त्यांच्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून त्या व्यक्तींमध्ये थोडाफार समजूतदारपणा येईल.
सध्या सोशल मीडियावर कंगना आणि तापसी पन्नू च्या वादाचा ट्रेंड सुरू आहे. कंगना आणि तापसी मध्ये कायमच छत्तीस चा आकडा होता. काही वेळेस कंगना ची बहिण रंगोली ने सुद्धा तापसी वर निशाणा साधला होता. यावेळी कंगनाने नेपोटिज्मवरून तापसी भोवती घेर धरला आहे.