साऊथ आणि बॉलिवूडची अभिनेत्री एलियाना डिक्रूझाची लव्ह लाइफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिनेत्री एलियाना डिक्रूझा अभिनेत्री कतरिना कैफच्या भावाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
अभिनेत्री इलियाना डिक्रूझाने अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा या चर्चांना उधाण आले.
कतरिना कैफनेही तिच्या इंस्टाग्रामवर मालदीवच्या येथे साजरा करण्यात आलेला वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री एलियाना डिक्रूझा आणि कतरिनाची बहीण इसाबेल, विकी कौशल, सनी कौशल, कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियनसोबत दिसली होती.
कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत एलियाना डिक्रूझाला पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. कारण याआधी कतरिना आणि एलियाना कधी एकत्र पाहिले गेले नव्हते. यानंतर अभिनेत्री एलियाना डिक्रूझा कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
मिळालेल्या माहितीनुसार दोघेही एकमेकांना कतरिना कैफच्या वांद्रे येथील जुन्या घरात भेटतात. इलियानाचे लंडनमधील घरही सेबॅस्टियनच्या घराजवळ आहे. इतकंच नाही तर एलियाना डिक्रूझा कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनलाही इन्स्टाग्रामवर फॉलो करते. त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते.
विशेष म्हणजे अभिनेत्री एलियाना डिक्रूझा काही काळापूर्वी इंग्लिश फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. त्यावेळी दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या. काही वर्षांच्या रिलेशननंतर अभिनेत्री एलियाना डिक्रूझा आणि अँड्र्यू नीबोनचा ब्रेकअप झाला. परंतू या ब्रेकअपचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !