या कारणासाठी प्रियांका चोपराचे वडील तिला छोटे कपडे घालण्यास मनाई करायचे, पण आता …. !

1013

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोपरा ही तिच्या वेगवेगळ्या फॅशन्स मुळे नेहमीच चर्चेत असते. दरवर्षी साजरा होणाऱ्या कान्स फेस्टिवल मध्ये रेड कार्पेटवर प्रियांका कोणत्या लुक मध्ये अवतरणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. २०१३ मध्ये प्रियांकाच्या वडिलांचा अशोक चोपरा यांचा मृत्यू झाला.


प्रियांका व तिच्या वडिलांचे नाते खूप घट्ट होते. ह्या गोष्टीचा पुरावा म्हणजेच प्रियांका च्या हातावर डॅडीज् गर्ल हा टॅटू कोरलेला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने तिच्या वडिलांसोबत च्या आठवणी जाग्या केल्या. ही मुलाखत टैटलर मॅगझिनच्या डिजिटल एडिशन साठी घेण्यात आला होती.


या मुलाखतीत प्रियांकाने जेव्हा ती युएस मधून भारतात परत आली होती तेव्हा च्या आठवणी सांगितल्या. भारतात परत आल्यावर तिच्या दिसण्यात खूप बदल झाला होता. दिसण्यात बदल झाल्यामुळे तिचे वडिल कसे रिऍक्ट झाले याबद्दलच्या आठवणी प्रियांकाने सांगितल्या.


प्रियांकाने सांगितले की जेव्हा ती सोळा वर्षांची होती तेव्हा ती युएसहून भारतात परत आली. त्यावेळी माझे केस थोडे कुरळे होते. माझा तो अवतार बघून माझे वडील थोडे घाबरले. सुरुवातीचे काही आठवडे माझ्याशी कसे वागावे हेच त्यांना समजत नव्हते. या मुलाखतीत प्रियांका शाळेत असताना तिच्या पाठी मुलगे कसे लागायचे याबद्दलच्या सुद्धा काही आठवणी सांगितल्या.


यामुळेच प्रियांकाच्या वडिलांनी तिच्यावर काही बंधने टाकली होती. त्यावेळी प्रियांकाचे वडील तिला छोटे कपडे सुद्धा घालू देत नसत. एवढेच नव्हे तर प्रियांकाने सांगितले की तिच्यात व वडिलांमध्ये अहंकाराची स्पर्धा खुप असायची. तिच्यासाठी ते फक्त वडीलच नव्हे तर एक खूप चांगले मित्र सुद्धा होते.


प्रियांकाने सांगितले की ते तिला नेहमी बोलायचे, तू जे काही करशील भले ते वाईट असो वा चांगले पण ते सर्वात आधी मला येऊन सांगायचे. मी तुझ्यासाठी सर्व काही ठीक करीन. तु जे काय करशील त्यावर मी कोणत्याही प्रकारचे परीक्षण करणार नाही. मी नेहमीच कुठल्याही परिस्थितीत तुला साथ देईन.


वडिलांच्या निधनानंतर प्रियांका पूर्णपणे मोडून गेली होती. वडील गेल्यावर प्रियांका तिच्या आईची म्हणजेच मधु चोपरा याची पूर्णपणे काळजी घ्यायची. प्रियांकाला एक भाऊ सुद्धा आहे. त्याचे पुण्याला स्वतः एक हॉटेल आहे. प्रियांकाने हॉलीवुड पॉप सिंगर निक जोनस सोबत २०१८ मध्ये लग्न केले.


लग्नानंतर ती निक सोबत लॉस एंजलिस मध्ये राहते. परंतु कामाच्या निमित्ताने आणि परिवाराला भेटण्यासाठी ती मुंबईला येत जात असते. लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.