Headlines

ही खरंच शक्तिमान मधील तमराज किलविश ची मुलगी आहे का, जाणून घ्या या व्हायरल न्यूज मागील सत्य !

९० च्या दशकातील मुलांचा आवडता टीव्ही शो म्हणजे शक्तिमान. त्यावेळी घरोघरी शक्तिमान लागले की सर्व मुले टीव्हीसमोर येऊन बसायची. ह्याच शक्तिमान सीरियल मधून घराघरात पोहोचलेला तमराज किलविष ही भूमिका लहान मुलांना खूप आवडायची. ही भूमिका साकारणारे सुरेंद्र पाल सध्या ‘पृथ्वी वल्लभ – इतिहास भी रहस्य भी’ या कार्यक्रमात दिसतात.


सुरेंद्र पाल यांची प्रोफेशनल लाईफ तर खूप छान आहे परंतु ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. एका मीडिया रिपोर्ट च्या अहवालानुसार साऊथ कडील अभिनेत्री रिया पनाई ही सुरेंद्र यांची मुलगी आहे. परंतु या व्हायरल बातमी मागचे सत्य काही वेगळेच आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुरेंद्र पाल यांनी सांगितले की, रीचा कोण आहे ? मला तर तीन मुलं आहेत !


व्हायराल झालेल्या बातमीनुसार सुरेंद्र यांच्या पत्नीचे नाव शकुंतला आहे असे बोलले जाते. या दोघांना रवी पनाई आणि मुलगी रिचा पनाई आहे असे बोलतात. रवी पनाई हा अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण रिचा साऊथ मधील सिनेसृष्टीत काम करते.

मात्र सुरेंद्र यांच्याशी झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या पत्नीपासून वेगळे राहतात पण त्यांना तीन मुले आहेत आणि ती तीनही मुले त्यांच्या सोबतच राहतात.


पण हल्ली मात्र रीचा माझी मुलगी असल्याचे सगळीकडे बोलले जाते. मी या गोष्टीने खरंच खूप हैराण आहे कारण मला तीन मुल आहेत मात्र रिचा ही माझी मुलगी नाही आणि मी तिला ओळखत सुद्धा नाही. तिच्या माझी मुलगी असल्याची बातमी साफ खोटी आहे. पण मी तिला तिच्या चांगल्या आयुष्यासाठी नक्कीच शुभेच्छा देईन.


सुरेंद्र यांनी त्यांच्या खर्‍या मुलांबद्दल सांगितले की त्यांचा मोठा मुलगा शिवम सिंह हा २७ वर्षांचा असून सध्या तो सूत्रसंचालक बनण्याची तयारी करत आहे. दुसरी मुलगी शिवांगी सिंह ही २३ वर्षांची असून गोव्यातील एका फाईव्ह स्टार जिम मध्ये मॅनेजर म्हणून काम करते. तर सर्वात लहान मुलगा शुभम सिंह हा दिल्ली युनिव्हर्सिटीमधून बी.कॉम करतो.


सुरेंद्र यांनी २००२ मध्ये त्यांची पत्नी बरखा सिंह सोबत घटस्फोट घेतला होता. या जोडप्याची तीनही मुले सुरेंद्र यांच्या सोबतच राहतात. पण तरीही हा प्रश्न राहतोच की सुरेंद्र यांची मुलगी असे म्हटले जाणारी रीचा पनाई नक्की आहे कोण? आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देतो.

रीचा पनाई नक्की आहे कोण?


रीचाचे सुरुवातीचे शिक्षण लखनऊ मधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड स्कूल मधून झाले. शाळेत असल्यापासूनच तिने अभिनेत्री बनण्याचे स्वप्न मनी बाळगले होते. १२ वी झाल्यानंतर रिचाने मिस लखनऊ चा किताब जिंकला होता.

ही कॉन्टेस्ट जिंकल्यावर अभिनेत्री शबाना आझमीने तिच्या डोक्यावर मानाचा ताज घातला होता. विकिपीडिया वर असलेल्या माहिती नुसार रिचा ने किंगफिशर एअरलाइन्स साठी एअर होस्टेस म्हणून काम केले आहेत.


रिचाने नोकरी सोबतच मॉडेलिंग करणे सुरू केले होते. यामध्ये तिला पहिला ब्रेक २०११ मध्ये आलेल्या मल्याळम चित्रपट Vaadamalli ने दिला. २०१२ मध्ये रियाला Asianet Film Award सुद्धा मिळाला होता. एवढेच नव्हे तर तिने बॉलीवूडमध्ये सुद्धा काम केले आहे

२०१६ मध्ये आलेल्या ट्राफिक या चित्रपटामध्ये ती दिसली होती. रिचार्जे आतापर्यंत मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि हिंदी असे मिळून पंधराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *