Headlines

रामानंद सागर यांच्या या सवयीमुळे सेटवर रागात असायचे रामायणमधील लक्ष्मण !

रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका सुनील लहरीने साकारली होती. रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका खूपच रंजक मानली जाते. आज्ञाकारी आणि मोठ्या भावासाठी पूर्णपणे समर्पित लक्ष्मणला आपल्या रागासाठीसुद्धा ओळखले जाते. लक्षणच्या भूमिकेसाठी सुनील लहरीला अशाच भावांमधून जायचे होते. प्रत्येक गोष्टीवर राग करणाऱ्या लक्ष्मणची भूमिका साकारणे सुनील लहरीला सोपे नव्हते.
एकीकडे जिथे भगवान रामची भूमिका शांत आणि सौम्य स्वभावाची होती तर दुसरीकडे लक्ष्मणची भूमिका अशी होती जी लवकरच उत्तेजित होत होती, आपले भान हरपत होता. सुनीलने या भूमिकेला आपल्या अभिनयाने कायमचे अजरामर बनवले. पण लक्ष्मण बनलेल्या सुनीलच्या रागाच्या मागे एक स्टोरी देखील लपलेली आहे. एका मुलाखतीमध्ये सुनीलने सांगितले होते कि रामानंद सागर रामायणच्या शुटींगमध्ये इतके बुडलेले असायचे कि ते लंच ब्रेक सुद्धा विसरून जात असत. आम्ही तेव्हा तरुण होतो, भूख लागायची. आम्हाला जेवण वेळेवर मिळत नव्हते.

हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !

वेळेवर जेवण न मिळाल्यामुळे मला खूप राग यायचा. रामानंद सागर माझ्या याच रागाचा वापर शुटींगमध्ये करून घेत असत. यामुळेच माझी लक्ष्मणची भूमिका इतकी संस्मरणीय राहिली. रामानंद सागर मला जाणूनबुजून रागावर आणायचे. पण ते मला त्यांचा सहावा मुलगा देखील मानत होते. द कपिल शर्मा शो मध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या सुनीलने सांगितले होते कि त्यांना लक्ष्मणची भूमिका कशी मिळाली.
सुनीलने विक्रम वेताळमध्ये काम केले होते. रामानंद सागरने लक्ष्मणच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याला फाईनल केले होते, रामानंद सागरच्या रामायणमध्ये लक्ष्मणची भूमिका सर्वात पहिला दुसऱ्याच कोणालातरी ऑफर केली गेली होती पण नंतर हि भूमिका सुनीलला मिळाली. शो सुरु झाल्यानंतर सुनील खूपच चर्चेमध्ये आले. त्यांच्यावर मिम्स देखील बनवले गेले. तरुणपणामधील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा – दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *