आपल्या अभिनयाने रामायण मध्ये लोकांना रडवणारे भरत आज या कारणामुळे नाहीत आपल्या सोबत !

713

लोकांची जबरदस्त मागणी पाहता २८ मार्च पासून रामानंद सागर निर्मित रामायण मालिका पुन्हा प्रक्षेपित होऊ लागली आहे. त्यावेळी या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक खरेखुरे देव मानू लागले होते. ही मालिका लागताच काही जण तर टीव्हीचीच पूजा करायचे.
त्यामुळे या लॉक डाऊन च्या काळात ही मालिका पुन्हा सुरू झाल्यामुळे त्या काळातील प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शिवाय आताच्या पिढीच्या मुलांना सुद्धा ते हौशीने ही मालिका पाहण्यास सांगतात. त्यामुळे रामायण मालिका सध्या इतर सर्व मालिकांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.
या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची तर दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका केली होती. या मालिकेत राम-लक्ष्मण आणि सीतेची भूमिका ही मुख्य होती मात्र रामायण हे भरत शिवाय अधुरेच! भरत या महत्त्वाच्या भूमिका साकारणार्‍या कलाकाराला कसे कोणी विसरू शकते. भरत या पात्राचा उत्कृष्ट अभिनय पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी यायचे.

हे वाचा – रामायणातील या ५ कलाकारांनी घेतला आहे जगाचा निरोप, पहा आणखी कोण आहेत !

पण तुम्हाला माहित आहे का भरत ही लोकप्रिय भूमिका करणाऱे कलाकार आज या जगात नाहीत. रामायण मालिकेत संजय जोग यांनी भरत ही भूमिका निभावली होती. मात्र आता अभिनेता या जगात नाही. संजय यांचा मृत्यू २७ नोव्हेंबर १९९५ ला लिव्हर फेल होण्यामुळे झाला होता. संजयने रामायणातील भरत या भूमिकेशिवाय मराठीत सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ते एक नामवंत अभिनेता होते.
एकेकाळी संजय जोग यांना पायलट बनायचे होते . मात्र १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांच्या एका जवळील व्यक्तीचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करू दिले नाही. संजय जोग यांनी मुंबईतील एलफिस्टन कॉलेजमधून त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !

संजय यांनी एक्टिंग चा कोर्स सुद्धा केला होता. त्याच काळात त्यांना मराठी चित्रपट सापळा मध्ये प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. संजय यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की ते मुंबईमध्ये हिरो बनण्यासाठी आले नाहीत. मात्र भरत ही भूमिका त्यांना मेकअप मॅन असलेल्या गोपाल दादा यांच्यामुळे मिळाली होती.
असे बोलले जाते की संजय यांना सर्वात आधी लक्ष्मण ही भूमिका ऑफर झाली होती मात्र त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांनी ही भूमिका नाकारली. पण त्यानंतर भरत ही भूमिका करण्याची संधी मिळाली.

हे वाचा – रामायण मालिकेतील या कलाकारांचे झाले निधन, लॉक डाऊन मुळे ही येत आहे अडचण !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !