Headlines

सलमान खानला काका म्हणाल्यामुळे सारा अली खान अडचणीत, सलमान म्हंटला आता तुझा चित्रपट गेला !

अभिनेत्री सारा अली खान तिच्या सहज स्वभावासाठी खूप लोकप्रिय आहे. सोबतच ती तितकीच बोल्ड आणि स्पष्टवक्ती आहे. पण साराच्या या स्पष्टवक्तेपणाने तिला अडचणीत आणले, कारण साराने यावेळी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतला.

सारा आणि सलमानचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दुबईमध्ये पार पडलेल्या आयफा 2022 या पुरस्कार सोहळ्यातील आहे. या कार्यक्रमात सलमान खान स्टेजवर शो होस्ट करत होता त्यावेळी साराने देखील काही वेळासाठी त्याच्यासोबत स्टेज शेअर केला होता. यादरम्यान, साराने सलमान खानला अंकल अशी हाक मारली. ते ऐकून सलमानचा चेहराच उतरला.

सारा सलमानला, ती लवकरच काही ब्रँड लॉन्च करणार असल्याचे सांगत असते त्यावेळी ती त्याला ‘सलमान अंकल’ म्हणून हाक मारते. ते ऐकून सलमान तिला म्हणतो की, तू मला सगळ्यांसमोर अंकल म्हणालीस आता तुझा चित्रपट गेला. ते ऐकून सारा लगेच म्हणते की, असा कसा चित्रपट जाईल तुम्हीच मला तुम्हाला अंकल अशी हाक मारायला सांगितले होते. त्यांच्यातील हे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना हसायला आले.

ही व्हिडिओ क्लिप आयफा २०२२ पुरस्कार सोहळ्यातल्या काही क्षणांपैकी एक आहे. हा सोहळा शनिवारी 25 जूनला कलर्स टीव्हीवर प्रसारित झाला. ही क्लिप कलर्सच्या इन्स्टा पेजवर देखील आहे. यामध्ये सलमान आणि सारा यांच्यातील अंकलवाल्या संभाषणानंतर ते खूप मस्ती करताना आणि डान्स करताना दिसतात.

साराच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती सलमान कतरिनासोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. तसेच सारा गॅसलाइट आणि विकी कौशलसोबत लुका छुपीमध्ये दिसणार आहे. सलमान सध्या हैदराबादमध्ये भाईजान चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असेल. तसेच त्याची एण्ट्री में एण्ट्री या सिनेमाचे शूटसुद्धा चालू आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !