Headlines

आधी विदुराच्या भूमिकेसाठी निवडले गेले होते महाभारतातील कृष्ण, जाणून घ्या कृष्ण ही भूमिका कशी मिळाली !

श्री. महाभारत कथा.. मै समय हू.. दुर्योधन.. कर्ण.. पांडव.. कौरव.. हे केवळ शब्द नाही तर एक प्रकारच्या आठवणी आहेत जे आपल्या मनात सारख्या घोळत असतात. जेव्हा जेव्हा या शब्दांचा उच्चार होतो तेव्हा ते शब्द आपल्याला काही वर्ष पूर्वीच्या काळात घेऊन जातात. ज्यावेळी महाभारत मालिका पाहण्यास लोक टिव्ही समोर तुटून पडायचे.
या महाभारतातील एक महत्वाचे पात्र होते ते कृष्ण. आणि ते निभावले होते नीतीश भारद्वाज. काही वेळेस मनात असा देखील प्रश्न येतो की याहून सुंदर भूमिका कोणी निभावली असती का ? कदाचित नाही ! कारण कृष्णाच्या भूमिकेची जी छाप नीतीश यांनी उमटवली आहे ती लोकांना अजूनही आठवते. पण तुम्हाला माहीत आहे का की नीतीश यांना कृष्णा ची भूमिका करायची नव्हती. एवढेच नव्हे तर त्यांना दुसऱ्याच एका रोल साठी निवडले गेले होते.
असे म्हटले जाते की महाभारतातील कृष्ण म्हणजेच नीतीश यांना आधी विदुराची भूमिका दिली होती. शूटिंग सुरू होणारच होती. पण नशिबाने काही वेगळेच लिहिले होते. त्यामुळे बी आर चोपडा यांचा मुलगा रवि चोपडा याने तो रोल नीतीश कडून काढून घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीस करण्यास दिला. एका मुलाखतीत स्वतः नीतीश यांनी ही गोष्ट सांगितली होती.

हे वाचा – दारासिंह यांना अशा प्रकारे मिळाला हनुमानाचा रोल, मुलगा विंदू सिंह याने सांगितली कहाणी !ते म्हणाले की, मला आधी विदुर या भूमिकेसाठी कास्ट केले होते. पण अचानक माझ्या ऐवजी दुसऱ्याचं व्यक्तीला तो रोल दिला गेला. त्यावेळी मी रविला चांगला ओळखायचो. आम्ही या आधी काही चित्रपटात काम सुद्धा केले होते. मी रवीला असे करण्यामागचे कारण विचारले तर रवि बोलला की तू आता २२/२३ वर्षांचा आहेस. आणि काही एपिसोड्स नंतर विदुर म्हातारा होईल. त्यामुळे ही भूमिका तुला सुट होणार नाही. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणता जॉब सुद्धा नव्हता. पण काही दिवसांनी मला महाभारत कडून पुन्हा बोलावणे आले.

हे वाचा – रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !
यावेळी मला बोलावले होते ते नकुल आणि सहदेव या भूमिकांसाठी. हे रोल मला करायचे नव्हते. कारण मला अभिमन्यूचा रोल खूप आवडला होता. आणि मला तोच रोल करायचा होता. याबद्दल मी रवी चोपडा सोबत सुद्धा बोललो. आणि सर्वात शेवटी जे नशिबात होते त्याची पटकथा लिहिली जाऊ लागली.
नीतीश यांना कृष्णाच्या भूमिकेसाठी स्क्रीन टेस्ट करायला बोलावले गेले. पण त्यांनी ती ऑफर नाकारली. कारण कृष्ण ही भूमिका साकारणारा अभिनेता हा कोणीतरी अनुभवी असावा असे नीतीश यांना वाटत होते. पण रवी चोपडा यांनी सांगितल्यावर त्यांना ही ऑडिशन द्यावीच लागली. अशा प्रकारे महाभारत मालिकेला योग्य तो कृष्ण मिळाला !
एका रिपोर्ट मधून मिळालेल्या माहितीनुसार कृष्ण या भूमिकेसाठी ५५ लोकांची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली होती. मात्र या ५५ लोकांमधून नीतीश भारद्वाज यांनी बाजी मारली. ज्यांना कृष्णाची भूमिका कधीच करायची नव्हती ! पण म्हणतात ना नशिबात जे लिहिले असते ते कोणीच बदलू शकत नाही.

हे वाचा – तब्बल १२ वर्षानंतर आयुषमान खुराणा आणि रामायण मधील त्रिजटा यांच्या नात्याचा राज कळाला !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *