Headlines

सोनम कपूरच्या एका साडी च्या किमतीत तुम्ही दुबई फिरून येऊ शकता !

अनिल कपूर ची लाडकी लेक सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखले जाते. प्रत्येक पार्टीमध्ये फंक्शनमध्ये किंवा इव्हेंटमध्ये तिच्या फॅशनचा एक वेगळाच अंदाज असतो. परंतु या कमालीच्या वेगळ्या अंदाजा साठी वापरले जाणारे कपडे हेसुद्धा वेगळ्याच कमालीच्या किमतीचे असतात.
हे कपडे सर्वसामान्य लोक खरेदी करू शकत नाहीत इतके महाग असतात. हल्लीच झालेल्या एका फंक्शन मध्ये सोनम कपूर पांढऱ्या रंगाच्या साडी मध्ये आली होती. या साडी मध्ये ती खरच खूप सुंदर दिसत होती त्यामुळे फोटोग्राफरच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. परंतु या साडीची किंमत इतकी आहे ज्यात सर्वसामान्य लोक दुबई फिरून येऊ शकतात.
सोनवणे काही दिवसांपूर्वीच एका फंक्शन मध्ये आइवरी ऑरगेंजा सिल्क साडी ज्यावर पांढऱ्या रंगाचे लेस वर्क असलेली साडी नेसली होती. त्यावर सोनमने फ्लोरल प्रिंट असलेला पांढरा रंगाचा क्रेप ब्लाउज घातला होता. त्यावर कानात तिने कस्टम मेड पर्ल अँड डायमंड इयर क्रॉलर घातले होते. यामध्ये ती एकदम एलिगंट अँड परफेक्ट अशा लुकमध्ये दिसत होती.
तिच्या लुकला कॉपी करण्यासाठी मार्केटमध्ये कदाचित अनेक ऑप्शन्स उपलब्ध असतील मात्र ती साडी हवी असल्यास तुम्हाला एक लाख रुपये खर्च करावे लागतील. सोनमने जे पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती ती मसाबा आणि रिया कपूरच्या जॉईंट डिझाईन लिमिटेड एडिशनचे प्रॉडक्ट आहे.
आम्ही तर तुम्हाला एवढेच सांगू शकतो की हे साडी तुम्ही फोटो मध्येच बघून मन भरून घ्या. बगीच्या साडीवर एक लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तुम्ही आरामात दुबईला फिरून येऊ शकता. ही ट्रिप तुम्हाला साडीपेक्षा तरी थोडीफार स्वस्तच पडेल. आणि या ट्रीप मधून उरलेल्या पैशातून मार्केटमधून फॅब्रिक खरेदी करून बुटिक मधून साडी स्वतः डिझाईन करून घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *