बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कधी कोण कोणाचा साथीदार होईल हे सांगता येत नाही. सलमान खान आणि रणवीर कपुर यांसारख्या सुपरस्टारला डेट केल्यानंतर अभिनेत्री कतरीना कैफ आता विकी कौशल सोबत जास्त दिसते. जिथे जिथे विकी कौशल दिसतो तिथे कतरीना हमखास दिसून येते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विकी कौशलचा भूत या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सुद्धा कटरीनाने उपस्थिती लावली होती. यावेळी कतरीना एकटीच आलेली नसून तिच्यासोबत तिची बहीण सुद्धा होती. बॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशल आणि कतरीना एकमेकांना डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक वेळा वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये दोघांना एकत्र पाहिले गेले आहे.
काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक अब्बास जफर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला दोघांना एकमेकांसोबत मस्ती करताना पाहिले गेले होते. त्याच वेळी पुन्हा हे कपल मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.
मागील काही महिन्यांपासून कतरीना चे नाव विकी कौशल सोबत जोडले जात आहे. आणि गंमत म्हणजे ही खबर पक्की असल्याचे नेहा धुपिया ने सांगितले. नेहा धुपिया ने तिच्या वोग बीएफ एफ २ या चॅट शो मधून कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांना डेट करीत असल्याचा खुलासा केला. नेहाने सांगितले की सध्या कतरीना च्या आयुष्यात एका खास व्यक्तीने एन्ट्री घेतली आहे. ती खास व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसुन बॉलिवूडचा न्यू कमर विकी कौशल आहे.
सलमान खान आणि रणबीर कपूर यांसारख्या सुपर स्टार्स ना डेट केल्या नंतर कतरीना आता विकी कौशल च्या प्रेमात पडली आहे. कतरीना आणि सलमान खानचे अफेअर २००५ मध्ये सुरू झाले होते. या दोघांचे नाते लग्नापर्यंत जाणार तितक्यात त्यांच्या मध्ये रणबीर कपूर आला. रणबीर आणि कतरिना ७ वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होते. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर कतरीना सिंगल होती.
मात्र मागील काही दिवसांपासून कतरीना वारंवार विकी कौशल सोबत दिसून येते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका मुलाखतीत विकीने सांगितले की तो सिंगल आहे. या आधी विकी खूप काळ गायिका हरलीन शेट्टी ला डेट करीत होता. पण काही दिवसांपूर्वीच दोघे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. हरलिन आणि विकीच्या ब्रेकअप चे कारण कतरीना आहे असे म्हटले जाते.
सलमान आणि रणवीर यांच्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ आता या अभिनेत्याला करते डेट !

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.
Leave a comment