शाहिद कपूर बरोबर झालेल्या ब्रेकअप बद्दल १३ वर्षांनी करीनाने सोडले मौन, सांगितले विभक्त होण्याचे कारण !

bollyreport
3 Min Read

एकेकाळी बॉलीवुडची अभिनेत्री करीना कपूर खान आणि शाहिद कपूर हे दोघे खूप प्रसिद्ध कपल म्हणून ओळखले जायचे. या दोघांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केले. त्यामुळेच करीना व शाहीद लग्न करणार आहे अशा चर्चासुद्धा बी-टाऊनमध्ये सुरू झाल्या होत्या. परंतु अचानक काही कारणास्तव हे कपल एकमेकांपासून विभक्त झाले. त्यांच्या विभक्ती नंतर तेवढा वर्षांनी करीनाने शाहिद बरोबर वेगळे होण्याचा निर्णय का घेतला याचे कारण जगासमोर आणलेल्या आहे.
करीना व शाहिद चा ऑन स्क्रिन रोमान्स सगळ्या जगाने बघितला आहे. इंम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या जब वी मेट या सुपर हिट चित्रपटांनंतर शाहिद व करीनाचा ब्रेक-अप झाला होता. त्यानंतर करीनाने अभिनेता सैफ अली खान सोबत लग्न केले. आता खूप वर्षांनी करीनाने शाहिद सोबतच्या ब्रेकअपचा एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.
या मुलाखातीत करीनाने शाहिद बरोबर झालेल्या ब्रेकअप पासून ते सैफ अली खान सोबत झालेल्या लग्न पर्यंतच्या
प्रवासाबद्दल खुलेआम गप्पा मारल्या. शाहीद सोबत झालेल्या ब्रेकअप बद्दल बोलताना करीना म्हणाली की, आपल्या नशिबाने आपल्या बाबत आधीपासूनच काही प्लॅन तयार केलेले असतात आणि प्लान च्या हिशोबाने जीवनात घटना घडत असतात. जब वी मेट या चित्रपटाच्या चित्रीकरणा पासून ते टशन या चित्रपटाच्या चित्रीकरणापर्यंत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे मी आणि शाहिद ने आमचा वेगवेगळा मार्ग निवडण्याचे ठरवले.
जब वी मेट मध्ये करीना कपूरच्या भूमिकेचे नाव गीत असे होते. करीनाने तिच्या ब्रेक अपबद्दल बोलताना गीत सोबत संबंध जोडला. करीना बोलली की तिचे वैयक्तिक जीवन व गीत या पात्राचे जीवन यांत बरेच साम्य आहे. त्यावेळी मला प्रोफेशनली व वैयक्तिकरित्या सांभाळणे खूप अवघड झाले होते. या चित्रपटात जसे तुम्ही बघता की चित्रपटाच्या सेकेंड हाफ नंतर गीत चे जीवन बदलून जाते तसेच काहीसे माझ्या वैयक्तिक आयुष्यात हा चित्रपट बनत असताना झाले होते.
एवढेच नव्हे तर टशन या चित्रपटाच्या वेळी मी त्या चित्रपटातील माझ्या भूमिकेबद्दल आणि माझ्या फिगर बद्दल खूप उत्साही होते. टशन या चित्रपटाने माझे आयुष्य बदलून टाकले कारण या चित्रपटाने मला माझ्या आयुष्याचा जीवनसाथी मिळवून दिला होता. करीनाने सैफ सोबत २०१२ मध्ये लग्न केले. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमूर ला जन्म दिला. तसेच शाहिद ने सुद्धा २०१५ मध्ये मीरा राजपूत सोबत लग्न केले. शाहिद ला आता मिशा व झैन अशी दोन मुले आहेत.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *