Headlines

एकमात्र अभिनेत्री जिच्या खूप जवळचाआहे सलमान, वाटेल जेव्हा करते फोन !

सलमान खान हे बॉलिवूड मधील हुकमी एक्का असलेले अभिनेते आहेत. आज हि सिनेमा गृहात त्यांचे चित्रपट हे फक्त त्यांच्या नावावर चालतात. चाहते आज हि त्यांचे चित्रपट आतुरतेने पाहत असतात. सलमान खान आणि त्याची बॉडी हे तर तरुणाईला वेड लावणारे आहे. मुली तर अक्षरशः सलमान यांच्या मागे दिवाने झालेले असतात. एवढं असून सुद्धा त्यांच्या लग्नाचा विषय हा बॉलीवुडचा सर्वात मोठा प्रश्न आहे. असं नाही कि सलमान यांच्या जीवनात कधी लग्नाचा योग्य आला नाही. संगीता बिजलानी यांच्या सोबत सलमान यांचे लग्न ठरून त्याच्या पत्रिका सुद्धा छापून तयार झाल्या होत्या.मग कटरीना पण सलमान यांची सहचारिणी बनणार होती पण शेवटी काही गोष्टी जुळल्या नाहीत आणि सलमान हे बिना लग्नाचेच राहिले. बॉलीवुड मध्ये अजून एक अभिनेत्री आहे ज्यांच्यासोबत सलमान यांचे चांगले ऋणानुबंध होते. आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत त्या आहेत ३५ वर्षीय ‘डेज़ी शाह. मुंबईच्या गर्दीत डांसरचे काम करणाऱ्या डेज़ी यांना सलमान यांनी वर आणले आणि चित्रपट ‘जय हो’ मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका करण्यास दिली. या शिवाय ‘रेस ३’ मध्ये सुद्धा डेज़ी यांनी आपली जादू दाखवली होती.
नुकताच डेजी यांनी दिलेल्या मुलाखतीत असा खुलासा केला कि, खऱ्या आयुष्यात सलमान यांच्याशी त्यांची जवळीक आहे . डेज़ी यांनी सांगितले मी त्यांच्याशी माझी प्रत्येक गोष्ट बाबत संवाद साधते. फक्त चित्रपटाच्याच नाही तर माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करते. मी वाटेल तेव्हा त्यांना फोन करते आणि सल्ले घेते. डेज़ी यांनी हे स्पष्ट केले कि त्या त्यांचे सर्व रहस्यमय गोष्टी सलमान यांच्याशी शेअर करतात.
डेज़ी यांनी पुढे सांगितले कि – आम्ही व्यक्तिगत पातळीवर खूप साऱ्या गोष्टी एकमेकांना सांगतो, आमचे समीकरण च वेगळे आहे. हि गोष्ट माझ्यासाठी सर्वकाही आहे. आज पर्यंत कोणत्याच अभिनेत्रीने आपण सलमान यांच्या एवढे जवळ असल्याचं सांगीतले नाही. असे म्हणने चुकीचे ठरणारे नाही कि डेज़ी हि एकमात्र अशी अभिनेत्री आहे ज्यांच्यासाठी सलमान हमेशा तत्पर असतो. कामाबद्दल बोलले तर सलमान यांचा ‘राधे’ ईद २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच डेज़ी प्रादेशिक सिनेमामध्ये आपले भाग्य चमकावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *