Headlines

यामुळे सलमान खान चित्रपटामध्ये करत नाहीत किस्सिंग सीन !

२३ फेब्रुवारी म्हणजे ९० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिचा वाढदिवस. भाग्यश्री आता ५१ वर्षाची झाली आहे. मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खान सोबत भाग्यश्रीने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी मैने प्यार किया हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. तुम्हाला माहित आहे का की, भाग्यश्री मुळेच सलमान खानने कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन न देण्याची शपथ घेतली. सलमान खान कधी ही किसिंग सीन देणारच नाही असे त्याचे कधीच ठरलेले होते परंतु १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला सुरज बडजात्या यांचा मैने प्यार किया या चित्रपटात सलमान खान भाग्यश्री सोबत किसिंग सीन देण्यासाठी तयार झाला होता मात्र त्यावेळी भाग्यश्रीने स्वतः सलमानसोबत किसिंग सीन देण्यास नकार दिला.
भाग्यश्रीला जसे माहित पडले की चित्रपटांमध्ये तिला सलमान खान सोबत किसिंग सीन द्यायचा आहे त्यावेळी ती खूपच नाराज झाली. त्यावेळी भाग्यश्री तिचे पती हिमालय दासांनी यांना डेट करीत होती. तिचे त्यांच्याशी लवकरच लग्न होणार होते. म्हणून चित्रपटातील किसिंग सीन मुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तिने सलमान खानसोबत किसींग सीन देण्यास नकार दिला. त्यावेळेस सलमान खान जाणून चुकला की एका अभिनेत्रीला चित्रपटाचे चित्रीकरणादरम्यान कोण कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते.
२०१५ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत सलमान खानने सांगितले की मैने प्यार किया या चित्रपटात किसिंग सीनच्या चित्रीकरणाची जेव्हा वेळ आली तेव्हा मला वाटले की मी तो सीन कसा करेन. यासाठी मी सुरत जवळ गेलो आणि त्याला सांगितले की हा सीन करण्यास माझ्यात सहजता येत नाही. यावर सुरज ने सांगितले कि तू अनकम्फर्टेबल आहेस. मी कमीत कमी तुला हा सीन कर असे सांगू शकतो. मात्र भाग्यश्री तो सीन करण्यास अजिबात राजी नाही. त्यावेळेस सूरज यांनी सलमानला सांगितले की ही राजश्री ची फिल्म आहे आणि महत्वाचे म्हणजे ही एक लव्हस्टोरी आहे. शिवाय या चित्रपटात फक्त एक छोटीशी किस आहे, तुम्हालाच स्मुच करायचे नाही. त्यानंतर सलमान या गोष्टीला राजी झाला मात्र राजश्री तिच्या परिवाराचा विचार करून स्वतःच्या विचारांवर ठाम होती की ती किसिंग सीन देणार नाही. खूप वादविवादानंतर सुरज सलमान खान व भाग्यश्री यांच्या किसिंग सीन न देण्याच्या निर्णयास राजी झाले त्यानंतर किसिंग सीन साठी ग्लास वॉलचा वापर केला. अशाप्रकारे या चित्रपटात बिना ओठांचे चुंबन घेता सलमानने भाग्यश्री सोबत लीपलॉक सिन केला होता.
त्या दिवसापासून ते आजच्या तारखेपर्यंत सलमान खानने त्याचे नऊ किसिंग सीन चे तत्त्व मोडलेले नाही. मैने प्यार किया या चित्रपटानंतर सलमान खाने स्वतः नियम घालून घेतला होता की तो कधीच कोणत्याही चित्रपटात किस किंवा लीप लॉक सीन करणार नाही. यामागील अजून एक कारण आहे की सलमान खान हा एक फॅमिली पर्सन आहे. त्याचे चित्रपट नेहमी सहकुटुंब सहपरिवार आणि एकत्र बसून पहावे अशी त्याची इच्छा असते. एवढेच नव्हे तर सलमान खानच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊस मधून बंधारा चित्रपटांमध्ये देखील किसिंग सीन नसण्याचा सलमान खानचा हट्ट असतो. टायगर जिंदा है या चित्रपटात सलमान खानला कटरीना सोबत किसिंग सीन द्यायचा होता मात्र त्यास त्याने नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *