‘माझा होशील ना’ मालिकेतून या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा करणार छोट्या पडद्यावर पदार्पण !

789

जवळपास गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. माझा होशील ना’ हि नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या मालिकेचे प्रोमोज झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाले.
या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण गौतमी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत एक नवा चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला असून अभिनेता कोण आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा नातू आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेत सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, अच्युत पोतदार, विद्याधर जोशी  असे अनेक प्रसिद्ध कलाकार देखील झळकणार आहेत. माझा होशील ना ही मालिका २ मार्च पासून रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.