Headlines

मोबाईलवर अधिक काळ व्हिडिओ गेम खेळल्यामुळे तुमच्या लाडक्या मुलासोबत हे घडू शकते !

मोबाईलवर सारखे व्हिडीओ गेम खेळण्याच्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे त्यांचे डोळे कमकुवत होतात. बुध्दीचा नीट विकास होत नाही. या सवयीमुळे एका जागेवर बसून मुलांचे वजन वाढते. जर वेळीच या सवयीला अाळा घातला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात.
मुलांच्या मोबाईलचा अति वापर करण्यामुळे पालक चिंताग्रस्त होतात. या सवयी मुळेच मुलांचे अभ्यासावर देखील मन लागत नाही. ते त्यांचा सर्वाधिक वेळ मोबाईलवर खेळण्यातच घालवतात. मोबाईल मध्ये अधिक वेळ घालवल्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडल्यास सुरुवात होते. मोबाईलच्या स्क्रीनवर सारखे बघत राहिल्यामुळे डोळ्यांची नजर कमी होत जाते. याव्यतिरिक्त डोकेदुखी, मायग्रेन, सांधेदुखी यांसारख्या समस्यांना सुद्धा तोंड द्यावे लागते.
मुले मोबाईल वर व्हिडिओ गेम खेळण्यात अधिक वेळ घालवतात. काही मुलांना तर व्हिडिओ गेम खेळण्याची लत लागली आहे. या पिढीच्या मुलांची ही एक खतरनाक समस्या असल्याचा संकेत आहे. हल्ली तर मुले जेवते वेळीसुद्धा मोबाईलवर काहीना काही खेळातच असतात.त्यामुळे वजन वाढीची समस्या उद्भवते. कारण जेवते वेळी मोबाईल वापरणे हा मुलांच्या सवयीचा एक भाग होऊन जातो. जी मुले जेवतेवेळी मोबाईलचा वापर करतात ती मुलं इतर मुलांच्या तुलनेत अधिक वजनदार असतात. त्यामुळे ही सवय सोडवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा.
आठ वर्षाहून कमी वय असलेल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे. मोबाईलचा अधिक काळ वापर करणाऱ्या मुलांचा मेंदू पूर्णपणे विकसनशील होत नाही. मेंदूचा नैसर्गिकरित्या विकास झाला पाहिजे. असे झाल्यामुळे मुलं संवेदनशील होते व त्यांच्यातील विचार करण्याची क्षमता विकसित होत जाते. मोबाईल वापरण्याची सवय सहजासहजी सुटत नाही. मोबाईल वापरण्याचा मुले नेहमी हट्ट करत असतात. मोबाईल नाही दिला तर ते काही वेळेस नाराज देखील होतात. अशावेळी ते अधिक मस्ती करतात किंवा जेवत नाहीत. या समस्येचा सामना करू लागू नये यासाठी त्यांना आधीपासूनच मानसिक रित्या समजवावे आणि हळूहळू ती सवय मोडण्याचा प्रयत्न करावा. मोबाईलची सगळे सोडण्यास खूप अडचणी येतील परंतु योग्य रीतीने प्रयत्न केल्यास नक्कीच सफलता मिळेल.
मुलांना मोबाईलच्या सवयीपासून अशाप्रकारे दूर ठेवा
>मुलांना स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी साठी प्रोत्साहित करा. > जास्तीत-जास्त मैदानी खेळ खेळण्यास तयार करा. > मित्रांसोबत मिळून मिसळून कसे खेळावे हे शिकवा. > मुलांसाठी दैनंदिन वेळापत्रक तयार करा आणि त्याप्रमाणे त्यांची दिनचर्या ठरवा. > रिकाम्या वेळी काहीतरी क्रिएटिव्ह बनवण्यास प्रेरित करा. > रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. रात्री उशीरा पर्यंत जागणे मुलांच्या आरोग्यास हानिकारक असते. > मुलांच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. खाण्याच्या पदार्थात पौष्टिकता असेल याची काळजी घ्या. > जेवणामध्ये आज अधिकतर हिरव्या भाज्यांचा वापर करावा.
मुलांना जंक फूड पासून दूर ठेवा. > झोपण्यापूर्वी कोमट दूध द्या. कोल्ड्रिंग च्या ऐवजी लस्सी किंवा ज्यूस पिण्यास प्रेरित करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *