बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकारांच्या भूमिका असतात आणि काही अभिनेत्री, अभिनेत्यांनी तर बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तर असाच एक अभिनेता आहे ज्याने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आताच्या घडीला तो बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे; तो म्हणजे कुणाल खेमु. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या महेश भट यांच्या सर या चित्रपटात बालकलाकार म्हणून त्याने प्रथम काम केले.
त्यानंतर १९९६ साली प्रदर्शित झालेल्या “राजा हिंदुस्तानी” या चित्रपटामध्ये देखील कुणालने काम केले. हा सर्वाधिक लोकप्रिय झालेला चित्रपट होता.
प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद देखील त्यांना मिळाला होता. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामे केली होती. धर्मेश दर्शन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटामध्ये आमिर खान व करिष्मा कपूर हे मुख्य कलाकार होते. यांच्याव्यतिरिक्त सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरन सिंह, जॉनी लिव्हर, फरीदा जलाल अशी जबरदस्त स्टारकास्ट होती. या चित्रपटात अमीर खान हा टॅक्सी चालक होता तर लहान कुणाल खेमू हा त्याचा टॅक्सी पार्टनर होता व त्याच नाव रजनीकांत होतं. कुणालची हि भूमिका तर अमीर खानच्या भूमिकेवर देखील भारी पाडली होती.
क्रिटिक्स सोबत प्रेक्षकांनी देखील कुणालच्या या भूमिकेची खूप प्रशंसा केली होती. या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना म्हणजे शहरातील एक श्रीमंत मुलगी व टॅक्सी ड्राइव्हर यांची प्रेमकथा. करिष्मा कपूर ही तिच्या मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जाते, तेव्हाच तिची भेट राजा नावाच्या टॅक्सी ड्राइवरसोबत होते आणि या दरम्यानच हे दोघे हि एकमेकांच्या प्रेमात पडतात. करिष्मा कपूरचे वडील या नात्याच्या विरोधात असतात पण तरीही नंतर ते मेनी करतात आणि इथूनच होते चित्रपटाच्या खऱ्या कथेला सुरुवात.
कुणाल खेमूने बालकलाकार म्हणून त्याच्या पहिल्या जख्म या चित्रपटामध्ये अजय देवगणच्या लहानपणीच्या भूमिकेचे सादरीकरण केले. या पात्राची गंभीरता आणि दुःख जा पद्धतीने कुणालने अभिनयातून दर्शवले, यामुळे सगळेच भारावून गेले. हा बालकलाकार सर्वांच्याच परिचयाचा आणि लाडका देखील झाला. कुणालने बालकलाकार म्हणून जितके चित्रपट केले त्यापैकी बरेच चित्रपट हे अमीर खानसोबत केले आणि प्रत्येक चित्रपटामध्ये त्या दोघांची जबरदस्त बॉण्डिंग देखील पाहता आली.
२५ मे ला कुणाल खेमूने त्याचा ३८ व वाढदिवस साजरा केला. त्याने जख्म, राजा हिंदुस्तानी, भाई, हम हे राही प्यार के, दुश्मन या चित्रपटांमध्ये कुणालने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. पण एक सोलो हिरो म्हणून तो यशस्वी ठरला नाही. कलयुग, ढोल, ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !