लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेले ऊंट, ससा आणि मोर शोधून दाखवतील, फोटो ZOOM करून पहा उत्तर सापडेल !

bollyreport
2 Min Read

लॉकडाऊनमध्ये सर्वचजण घरात असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्यापरीने स्वताचे मनोरंजन करण्यावर भर देत आहे. कोणी कुकींग करतय तर कोणी स्वताच्या फिटनेसकडे लक्ष देतय. तर काहीजण त्याचा वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत. सोशल मीडियामुळे घरबसल्या कुठे काय चाललयं हे समजतं. स्वताचे मनोरंजन करता येते. याच सोशल मीडियावर डोक्याला चालना देणाऱ्या अनेक कोडी, पझल येत असतात. त्यात काही फोटो दिलेले असतात. त्यात काही गोष्टी शोधण्याचे आवाहन केलेले असते. अशा कोड्यांमध्ये आपल्या कल्पनाशक्तीची कस लागलेली असते.

असेच एक कोडे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या कोड्यात एका चेहऱ्याचा फोटो दिला आहे. त्या चेहऱ्यात हत्ती, ससा, घोडा, वाघ, अस्वल, कांगारु यांसारखे अनेक प्राणी दिसत आहेत. आता या सर्व प्राण्यांमध्ये तुम्हाला ऊंट, ससा आणि मोर शोधायचे आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय एवढं.. कोणी ही ते करेल. पण मंडळी तुम्ही समजता तेवढं हे सोप्प नाही बरं.

हा फोटो आईपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटर वर शेयर करत यात उंट शोधा असे सांगितले आहे. या फोटोसोबत टेस्ट योर आइज कॅप्शन दिले आहे. तर मग तुम्ही पण हा फोटो पाहुन त्यातील उंट शोधुन तुमच्या डोळ्यांची परीक्षा घ्या.

हा फोटो नीट पहा आणि त्यातील उंट शोधण्याचा प्रयत्न करा. आयपीएसने केलेल्या पोस्टवर अनेकांनी उत्तर दिले आहे. त्यातील काही जण हे कोडे सोडवण्यात यशस्वी ठरले तर काही जण अपयशी. मंडळी जर तुम्हाला यातील उत्तर शोधता आले नाही तर काळजी करु नका. आम्ही तुम्हाला याचे खरे उत्तर देतो.

या फोटोच्या डाव्या गालावर ओठांच्या कडेला नीट निरखुन पहा. तुम्हाला तुमचे उत्तर सापडेल. आशा आहे की तुम्हाला आता तरी तुमचे उत्तर सापडले असेल. तुम्हालापण जर हे कोडे मजेदार वाटले असेल तर तुमच्या मित्रमैत्रीणी आणि नातेवाईकांना शेअर करा. त्यांनापण त्याच्या डोळ्याची टेस्ट करायला सांगा. अशा प्रकारच्या डोक्याला चालना देणाऱ्या कोड्यांचा सराव करायला हवा. यामुळे तुमची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा, तुम्हाला या फोटोमधील उंट शोधायला किती वेळ लागला हे कंमेटमध्ये कळवायला विसरु नका.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.