Headlines

या बॉलीवूड गायकाने चक्क या कारणामुळे माधुरी दीक्षित सोबत लग्न करण्यास दिला होता नकार !

बॉलीवूड चे सुप्रसिद्ध संगीतकार सुरेश वाडकर यांनी नुकताच त्यांचा ६५ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये झाला. संगीताची आवड त्यांना बालपणापासूनच होती. त्यामुळे त्यांनी मोठेपणी गायक व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटायचे. शिवाय सुरेश वाडकर यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण केले. सुरेश वाडकर जेव्हा १० वर्षांचे होते त्यावेळी त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. त्यांनी हिंदी आणि मराठी गाण्यां व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत.
सुरेश वाडकर यांनी आतापर्यंत अनेक प्रकारची भजने गायली. वॄष्टी पडे टाकूर टुकुर हे त्यांनी गायलेले चित्रपटासाठीचे पहिले गाणे. हे गाणे रवींद्र जैन यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या पहेली या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांच्याकडून गाऊन घेतले होते. त्यानंतर जयदेव यांनी गमन या चित्रपटासाठी सीने मे जलन हे गाणे गाण्याची संधी दिली. त्यानंतर वाडकरांनी बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली.

एकेकाळी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये सुरेश वाडकर या नावाचा दबदबा होता. ज्यावेळी सुरेश वाडकर यांच्याकरिता लग्नासाठी मुलगी शोधले जात होती त्यावेळेस अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या एका परिवारिक मित्राने माधुरीच्या परिवाराला हे स्थळ सुचवले होते. त्यावेळेस माधुरीला सुद्धा संगीत व नृत्यामध्ये रुची होती.
त्यानंतर माधुरीचे परिवारातील सदस्य माधुरीचे स्थळ घेऊन सुरेश वाडकर यांच्या घरी गेले. यावर सुरेश वाडकर यांनी माधुरीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जेव्हा सुरेश वाडकर माधुरीला भेटले त्यावेळी त्यांनी या स्थळाला नकार दिला. आणि नकार देण्याचे कारण सांगितले की मुलगी खूप बारीक आहे.
सुरेश वाडकर मुंबई आणि न्यूयॉर्क मध्ये त्यांची म्युझिक स्कूल चालवतात‌. येथे संगीतात रुची असलेल्या विद्यार्थ्यांना म्युझिक शिकवले जाते. यासोबतच त्यांनी एक ऑनलाईन म्युझिक स्कूल सुद्धा ओपन केले आहे. सुरेश वाडकर यांना त्यांच्या गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

हे वाचा – वडिलोपार्जित संपत्तीवर नुकत्याच झालेल्या नवीन सु ना व णी नुसार मुलींना आणि सुनांना वडिलोपार्जित संपत्तीवर असा असेल अधिकार !

त्यांना हा पुरस्कार मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटातील ‘हे भास्करा क्षितिजावरी या’ या गाण्याच्या गायनासाठी २०११ मध्ये मिळाला होता. याशिवाय महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांना २००७ मध्ये महाराष्ट्र प्राइड अवॉर्ड देऊन सन्मानित केले होते. तर मध्यप्रदेश मध्ये त्यांना लता मंगेशकर अवार्ड देऊन सन्मानित केले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरेश वाडकर यांना या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आले. सुरेश वाडकर यांनी शास्त्रीय गायिका पद्मा यांच्याशी लग्न केले आता त्यांना जिया व अनन्या या दोन मुली आहे. सुरेश वाडकर यांनी त्यांच्या करिअरमध्ये श्रीनिवास खळे, आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, श्रीधर फडके , हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या दिग्गजांसोबत गाणी गायली आहे.

हे वाचा – सोशल मीडियावर एका युजरने अमिताभ बच्चन यांना विचारले की संपत्ती दान का करत नाही ? त्यावर त्याचे उत्तर बघा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !