Headlines

वय ६२, ३५० चित्रपट, १९० कोटी संपत्तीचा मालक हा बॉलिवूड अभिनेता कधीकाळी विकत होता रस्त्यावर पेन !

आपलं नशीब आपलं आयुष्य घडवतं असे काही जण म्हणतात कदाचित त्यांचं खरं आहे. कारण नशिबाने साथ दिली तर माणूस कुठच्या कुठे जाऊन पोहोचतो. बॉलिवूड कलाकारांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या नशीबाने जोरदार साथ दिलेली दिसते कारण काहीच बॅकग्राऊंड नसताना बॉलीवूड मध्ये आलेले काही कलाकार असे काही चमकतात जेणेकरून त्यांच्या आयुष्याची कायापालट होते.
सध्या बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या नशिबाच्या आणि टॅलेंट च्या जोरावर खूप यश मिळवले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुप्रसिद्ध बॉलिवूडमधील विनोदी कलाकाराबद्दल सांगणार आहोत. आपण ज्या विनोदी बॉलिवूड अभिनेता बद्दल बोलत आहोत तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून जॉनी लिव्हर आहे.
जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६१ मध्ये झाला होता. आता ते ६२ वर्षांचे झाले आहे. बॉलीवूड मध्ये जॉनी लिव्हर यांचे नाव विनोदी कलाकार म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मात्र बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जॉनी लिव्हर रस्त्यावर पेन विकायचे हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.
जॉनी लिव्हर मूळचे आंध्र प्रदेशातील आहे मात्र लहानपणी घरातील आर्थिक परिस्थिती मुळे ते मुंबईत राहायला आले. मुंबईतील रस्त्यांवर पेन विकू लागले होते. पेन विकून जास्त कमाई व्हावी यासाठी रस्त्यावर ते कलाकारांची मिमिक्री करायचे. त्यांच्या या अप्रतिम कलेमुळे पुढे त्यांना स्टेज शो करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी हैदराबाद पासून मुंबई पर्यंत अनेक एक स्टेज शो केले.

अशाच एका शो दरम्यान सुनील दत्त जॉनी लिव्हर यांच्या या कॉमेडी करण्याचा कलेला खूप प्रभावित झाले आणि त्यांनी जॉनी लिव्हर ला दर्द का रिश्ता या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. बाजीगर या चित्रपटातील जॉनी लिव्हर यांच्या अभिनयाची खूप प्रशांसा झाली. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या.
आतापर्यंत जॉनी लिव्हर यांनी ३५०च्या आसपास चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी बॉलीवुड व्यतिरिक्त तमिळ चित्रपटात पण काम केले आहे. चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी बक्कळ पैसा कमावला असून ते आता खूप श्रीमंत झाले आहेत. एकेकाळी रस्त्यावर पेन विकणाऱ्या जॉनी लिव्हर यांच्याकडे आत्ताच्या काळात १९० करोड रुपयांच्या आसपास संपत्ती आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !