Headlines

या कारणामुळे ‘ऋषी कपूर’ आणि ‘सलमान खान’ यांच्यामध्ये होते वैर !

चित्रपट सृष्टीत कलाकारांमधील संबंध बिघडत असतात, ठीक होतं असतात, तरं काहींचे घनिष्ठ, सलोख्याचे संबंध तयार होतात. पण काही कलाकारांमधील मतभेद कधीही कमी होतं नाहीत. ३० एप्रिल रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अनुभवी कलाकार, अभिनेता ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाले.
ऋषी कपूर तसे रागिष्ट होते पण हिंदी चित्रपट सृष्टीत एका अभिनेत्यासोबत त्यांचे संबंध फार चांगले नव्हते आणि तो अभिनेता म्हणजे सलमान खान. सलमान व ऋषी कपूर यांचे सुरुवातीला संबंध फार चांगले होते. इतकेच नव्हते तरं त्यांनी एकत्र चित्रपट सुद्धा केला आहे.
माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार सलमान आणि ऋषी कपूर यांच्यामधील संबंध हे रणबीर कपूर चित्रपट सृष्टीत येण्याआधीपासून होते. एके दिवशी पबमध्ये सलमान आणि संजय दत्त पार्टी करत होते. तेवढ्यात तिथे रणबीर कपूर आपल्या मित्रांसोबत पोहोचला आणि त्या पबमध्ये सलमान व रणबीर या दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले आणि हाणामारी पर्यंत हे भांडण पोहचले.

हे वाचा – टिव्हीवर खळखळून हसायला लावणारे हे कलाकार एका शोसाठी घेतात एवढी फी !एवढच नव्हे तर सलमानने रणबीरला कानाखाली देखील मारली होती. या भांडणानंतर सलीम खान यांनी सलमान खानच्या वतीने ऋषी कपूरची माफी मागितली होती. त्यानंतर त्या दोघांमधील ही संबंध ठीक झाले होते. रणबीर कपूर जेव्हा चित्रपट सृष्टीत आला. स्वतःचे नाव कमवण्यासाठी तो प्रयत्न करत असताना कतरीना सोबत त्याची जवळीक वाढू लागली. त्याचं दरम्यान सलमान आणि कतरीना एकमेकांना डेट करत होते. परंतु रणबीर सोबत काम करता करता कतरीना आणि सलमानमध्ये नंतर दुरावा निर्माण झाला आणि रणबीर या दोघांच्या वेगळे होण्याचं कारण ठरला.

हे वाचा – गायक हिमेश रेशमियायांच्या पत्नीने श्री कृष्णामालिकेत निभावली होती हि भूमिका !सोनम कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये जेव्हा ऋषी कपूर आले तेव्हा सलमान खान ही तिथे होता पण सलमान खानने त्यांना नीट अभिवादन केले नाही. याच गोष्टीवरून ऋषी कपूर नाराज झाले आणि त्यांनी सोहेल खानची पत्नी सीमा खान हिला हा प्रकार सांगत तिला ओरडले होते. जेव्हा ऋषी कपूर आणि सीमा खान यांच्यामधील बोलण्याबद्दल सलमान खानला समजताच त्याला राग आला आणि त्या दोघांमध्ये वाद झाला.

हे वाचा – इरफान खान यांनी शेवटच्या मुलाखतीमध्ये बोललेली वाक्य वाचून तुम्ही पण भावुक व्हाल !यानंतर सलमान खानने ऋषी कपूर यांचे नाव न घेता म्हणाला, जर कोणी माझा व माझ्या परिवाराचा अपमान करत असेल तर मी त्या व्यक्तीला मान देऊ शकत नाही. अशी एक-दोन कुटुंब आहेत जिथून मला प्रेम वा मान मिळालेला नाही. काही लोकांचे माझ्या घरी कधी स्वागत होणार नाही. अशापद्धतीने संबंध बिघडत – सांभाळत असताना जेव्हा ऋषी कपूर यांचा निधनाची बातमी कळताच सलमान अस्वस्थ झाला.
त्याचा ट्वीटमध्ये त्याने लिहले – तुमच्या आत्म्याला शांती लाभो चिंटू सर…. काही चुकीचं बोललो असेन तरं माफी असावी…..तुमच्या कुटुंबाला व मित्रपरिवाराला धैर्य आणि शांती लाभो.

हे वाचा – स्टार प्लसच्या या बालकलाकार आता झाल्या आहेत एवढ्या मोठ्या, एक आहे साऊथची मोठी हिरोईन !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *