Headlines

शाळेच्या गणवेशात खूप सुंदर दिसत आहे ही अभिनेत्री, एकेकाळी एकाच मालिकेसाठी मिळाले होते १२ पुरस्कार !

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण देशभरात स्वतःचे नाव कमावले आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. दिव्यांका सर्वप्रथम जी टीव्हीच्या जी टीन क्वीन या मालिकेत दिसली होती. त्यानंतर ती इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज मध्ये दिसली. मात्र तिला खरी ओळख २००६ मध्ये आलेल्या ‘बनु मै तेरी दुल्हन’ या मालिकेने मिळवून दिली.
‘बनु मै तेरी दुल्हन’ या मालिकेनंतर दिव्यांका ची दुसरी सुपरहिट मालिका म्हणजे ‘ये हे मोहब्बते’. ही मालिका स्टार प्लस वाहिनीवर २०१३ ते २०१९ दरम्यान प्रसारित व्हायची. ही सिरीयल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती.
प्रसिद्ध वेबसाईट विकिपीडिया नुसार दिव्यांका ला या मालिकेसाठी बेस्ट एक्ट्रेस जुरी, बेस्ट एक्ट्रेस पॉप्युलर, बेस्ट एक्ट्रेस ऑफ द इयर, टेलिव्हिजन पर्सनालिटी ऑफ द इयर असे सर्व मिळून एकूण बारा अवॉर्ड मिळाले होते.
ही गुणी अभिनेत्री टीव्ही सोबतच सोशल मीडियावर सुद्धा खूप ॲक्टिव्ह असते. याच कारणामुळे तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर ११.७ मिलियन फॉलोवर्स आहेत. नुकतेच दिव्यांका ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शाळेतील गणवेशा मधील काही फोटो शेअर केले. हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले कारण या फोटोमध्ये खरंच खूप सुंदर दिसत होती.

हे वाचा – डिज्नी चैनल वरील सहा बाल कलाकार आता कसे दिसतात ? यातील एक आहे करोड रुपयांची मालकीण !सध्या तिचे शाळेच्या गणवेशातील फोटो खूप व्हायरल होत आहेत. आतापर्यंत या फोटोला ४.७ लाख लाइक्स मिळाले आहेत. दिव्यांका टीव्ही सिरीयल व्यतिरिक्त स्टार प्लस च्या डान्स रिअलिटी शो ‘नच बलिये सीजन ८’ मध्ये सुद्धा दिसली होती.

हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !

हे वाचा – ह्या दिग्गज फिल्मी घराण्यातील अभिनेत्री सोबत प्रभास लग्न करणार असल्याच्या चर्चा ? पण ..

याशिवाय दिव्यांकाने स्टार प्लसच्याच सिंगिंग रियालिटी शो द व्हॉइस ३ चे सूत्रसंचालन सुद्धा केले आहे. याच बरोबर दिव्यांका एकता कपूरच्या ‘कोल्ड लस्सी और चिकन मसाला’ या वेबसीरीज मध्ये सुद्धा दिसली होती. या वेबसीरीज मध्ये दिव्यांकासोबत बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवाल ने काम केले होते.

हे वाचा – स्वतःचा बालपणीचा जुना व्हिडिओ बघून इमोशनल झाला हा अभिनेता, जाणून घ्या कोण आहे तो ?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *