Headlines

सलमान खानच्या ह त्ये चा कट रचणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात, असा रचला होता प्लॅन !

बॉलीवूडमधील अभिनेता सलमान व त्याच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सलमान खानचा ह*त्ये*चा कट रचणारा आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणारा आरोपी राहुल उर्फ सांगा उर्फ बाबा याला उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १५ ऑगस्टला राहुल याला पौडी गढवाल मधून अटक करण्यात आली होती.
यानंतर त्याला चार दिवसांच्या रि मां ड वर पाठवले गेले होते. मंगळवारी या रिमांड ची मुदत पूर्ण झाल्यामुळे पोलिसांनी त्याला कोर्टामध्ये दाखल केले. जिथून त्याला न्या या ल यी न को ठ डी त निमका जे ल म ध्ये पाठवण्यात आलं.

पोलीस अधिकारी राजेश दुग्गल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. राहुलने जानेवारी २०२०मध्ये गँ ग स्ट र लॉरेन्स बिश्नोई आणि संपत नेहराच्या इशाऱ्यावरून सलमानच्या घराची रे की केली होती. त्यानंतर त्याने राजस्थानच्या तु रुं गा त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला रे की ची माहिती दिली होती, असं दुग्गल यांनी सांगितलं. रे की केल्यानंतर राहुल पुन्हा राजस्थानात आला. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा संपूर्ण प्लॅन फेल गेला. दरम्यान, राहुलला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राहुल हा कुवि ख्या त गुंड असून त्याने आतापर्यंत चार ह*त्या केल्या आहेत. ऑगस्ट २०१९मध्ये झज्जरमध्ये एका व्यक्तिची ह*त्या केली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या इशाऱ्यावरून त्याने डिसेंबर २०१९मध्ये मनोट येथे एकाची ह*त्या केली होती. तसेच २० जून २०२०मध्येही त्याने भिवानी येथे एकाची ह*त्या केली होती. त्याने फरिदाबादच्या एसजीएम नगरमध्येही २४ जून २०२०मध्ये एकाची ह*त्या केली होती. दिल्लीच्या गु न्हे अन्वेषण विभागाने त्याला उत्तराखंडमधून अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू असून मुंबई पोलीसही त्याची चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !