Headlines

चित्रपटासाठी जेव्हा निर्मात्यांनी केली सोबत झोपण्याची मागणी तेव्हा श्रुतीने दिले हे उत्तर, मी तुमच्यासोबत झोपू …

वेडिंग एनिवर्सरी आणि बुधिया सिंह, बॉर्न टू रन यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसलेली मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे या दिवसात बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वर कास्टिंग काउच संबंधी लांबसडक पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत असून लोक तिची खूप प्रशंसा करत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये मी टू या मुमेंटने खळबळ माजवली होती.

https://www.instagram.com/p/Bv1WfSDncxY/

त्याकाळी हरॅसमेंट आणि कास्टिंग काउचच्या अनेक वेगवेगळ्या केस समोर आल्या होत्या. आता पुन्हा एकदा अभिनेत्री श्रुती मराठेने तिच्या सोबत घडलेली घटना सगळ्यांसमोर आणून मोठा गौप्यस्फोट केला आहे. नुकतेच श्रुतीने ह्यूमन ऑफ बॉम्बे नावाच्या अधिकृत इन्स्टा पेजवर ऑडिशनच्या वेळी निर्मात्याद्वारे तिच्याबरोबर घडलेली एक घटना सर्वांसमोर आणली.
मात्र या पोस्टमध्ये श्रुतीने ती कुठल्या चित्रपटाचे ऑडिशन देण्यास गेली होती किंवा त्या निर्माताचे नाव सांगितले नाही.

श्रुती ने सांगितले की तिच्या ऑडिशन ची सुरुवात अगदी साधारण पद्धतीने झाली होती. मात्र नंतर हळूहळू तिला काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले. त्यावेळी तिला समझोता आणि वन नाईट स्टॅन्ड या शब्दांचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र समोरील व्यक्तीच्या उद्देश काय आहे हे ओळखण्यास श्रुतीला वेळ लागला नाही.

त्यामुळे लगेचच तिने त्या निर्मात्याला खरमरीत उत्तर देत सांगितले की, मी तुमच्यासोबत झोपावे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या चित्रपटाच्या हिरोला कोणा सोबत झोपायला सांगणार आहात ? श्रुतीचे हे प्रत्युत्तर ऐकून त्या निर्मात्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाले. त्यानंतर इतर अभिनेत्रींना सल्ला देण्यासाठी श्रुती म्हणाली की, तुमच्याकडे असे प्रोजेक्ट आले असतील तर ते वेळीच सोडून टाका. कारण दर वेळी आपण गप्प बसून आपलेच नुकसान करत असतो.

माझ्या मते जर कधी एखाद्या महिलेच्या बाबतीत काही चुकीचे घडत असेल किंवा तसा घडवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्या महिलेने त्या वेळी योग्य ते प्रतिउत्तर दिले पाहिजे. जेणेकरून ती व्यक्ती इतर दुसऱ्या मुलीसोबत अशी हरकत करू नये. जर त्यावेळी त्या महिलेने तसे केले नाही तर त्या व्यक्तीची हिम्मत अजून वाढेल.

अशाने तो इतर महिलांना सुद्धा त्याची शि का र होण्यास प्रवृत्त करेल. त्यामुळे माझे म्हणणे आहे की कास्टिंग काऊच किंवा हरॅसमेंट यांसारख्या प्रकरणाच्या शिकार झालेल्या महिलेने मी टू सारख्या आंदोलनाचे वाट पाहत बसू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !