Headlines

बॉलिवूड अभिनेता अमीर खान आहे तब्बल एवढ्या संपत्तीचा मालक आणि असा करतो तो पैसे खर्च !

“ऑल इज वेल” म्हणत सर्व गोष्टी शांतपणे हाताळण्याचा सल्ला देणारा ३ इडियट्समधील १ इडियट रांचो म्हणजे सर्वांचा लाडका आमिर खान होय. आमिर खान हा एक अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. १९७३ साली आलेल्या ‘यादों की बारात’ ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलाकार म्हणून काम करत सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘कयामत से कयामत तक’ ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
त्यानंतर आमिरने रंग दे बसंती, गजनी, दंगल, ३ इडियट्स सारखे अफलातून चित्रपट केले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या ‘सत्यमेव जयते’ ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

एका वेबसाईटचा नेटवर्थ रिपोर्टनुसार, आमिर खान जवळ १८० मिलियन डॉलर (१२६० करोड रुपये) इतकी संपत्ती आहे. वार्षिक उत्पन्न २१ मिलियन (१४७ करोड) इतके आहे. आमिर खानचा पाचगणी इथे २ एकरमध्ये पसरलेला बंगला आहे. त्याची किंमत तब्बल १५ करोड इतकी आहे. आमिर खान अनेकदा आपल्या परिवारासहित तो येथे फिरायला जातो.
याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील काही शहरांमध्ये देखील आमिर खानचे बंगले आहेत. उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे आमिर खानचे गाव आहे, तिथे देखील त्याची जागा आहे. याठिकाणी आमिरचे परंपरागत घर आहे, सोबतच शेत, बागा देखील आहेत. या जागेची एकूण किंमत ३० करोड इतकी आहे. आमिर खानजवळ भारतात एकूण २२ बंगले आहेत सोबतच अमेरिकेमध्ये बेवर्ली हिल्स येथे एक बंगला आहे त्याची किंमत ७५ करोड इतकी आहे.
आमिर खानला अभिनयासोबतच स्वतःच्या चित्रपट निर्मिती कंपनीमधून देखील पैसा मिळतो. आणि ही चित्रपट निर्माती कंपनी त्याची पत्नी किरण राव ही चालवते. त्याशिवाय आमिर खान इतर नामवंत ब्रँड्सचा जाहिराती देखील करतो.
आमिर खानच्या वाहनांविषयी बोलायचे झाले तरं त्याच्याकडे BMW 7 सीरिज (1.2 करोड), रेंज रोवर (1.74 करोड), बेंटले कांटिनेंटल फ्लाइंग स्पर (3.10 करोड), रॉल्स रॉयस कूपे (बुलेटप्रूफ) (4.6 करोड), मर्सिडीज बेंज एस600 Guard (10.50 करोड) सारख्या मोठ्या कार आहेत. मर्सिडीज बेंज एस600 Guard बुलेटप्रूफ आणि बॉम्बप्रूफ कार आहे. या सर्व गाड्यांची एकूण किंमत जवळ जवळ 21 करोड इतकी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !