Headlines

हे कलाकार अभिनयासोबतच अभ्यासात सुद्धा आहेत अव्वल, जाणून घ्या त्यांचे शिक्षण !

ग्लॅमरस दुनियेत असे काही कलाकार आहेत ज्यांचे कौतुक प्रत्येक जण करत असते. मात्र फिल्मी दुनिये सोबतच टीव्ही इंडस्ट्री मधील कलाकारांचा जलवा सुद्धा काही कमी नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु या झगमगत्या दुनियेत असेही काही कलाकार आहेत जे अभिनयात तर माहिर आहेतच पण त्याच सोबतच अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशा कलाकारांबद्दल सांगणार आहोत अभ्यासातील डिग्री सुद्धा मिळवली आहे आणि आता टीव्हीवर टॉपच्या कलाकारांपैकी एक आहेत.
१) दिव्यांका त्रिपाठी –
दिव्यांका त्रिपाठीला तर आपण सर्वजण ओळखतो. दिव्यांका टीव्ही जगतातील एक नामांकित अभिनेत्री आहे. तिची ‘ये हे मोहब्बते’ ही मालिका खूप गाजली. या मालिकेत दिव्यांकाने इशिता भल्ला हे पात्र साकारले होते. दिव्यांका एक सुंदर अभिनेत्री सोबतच अभ्यासू सुद्धा आहे.
तिने उत्तर काशी येथील नेहरू स्कूल ऑफ माउंटेनियरिंग मधून माउंटेनिंगचा कोर्स केला आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांकाने भोपाळ येथील रायफल अकॅडमी मध्ये एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुद्धा होती.
२) करण पटेल –
ये हे मोहब्बते या मालिकेत आपण करण पटेल ला पाहिलेच असेल. प्रसिद्ध अभिनेता करण पटेल ने मीठीबाई कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि नंतर लंडन स्कूल ऑफ आर्ट्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले.
याशिवाय तो श्यामक डावर डान्स अकॅडमी मधील हिस्सा सुद्धा होता.

हे वाचा –  सलमान, विराट किंवा सनी लियोनी नव्हे तर या अभिनेत्रीला केले जाते सर्वाधिक जागतिक सर्च !

३) दीपिका सिंह –
दीपिका सिंहला लोक ‘दिया और बाती’ या मालिकेमुळे ओळखतात. या मालिकेत तिने संध्या बिंदणीचा रोल केला होता. दिपीका तिच्या खऱ्या आयुष्यात खूप शिकली सवरलेली आहे. तिने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

हे वाचा – चित्रपटात यश मिळायला लागल्यानंतर या अभिनेत्रीने साखरपुडा मोडून सोडले तिच्या बॉयफ्रेंडला !

४) अनस रशिद –
दिया और बाती या मालिकेत अनपढ हलवाई सुरज ची भूमिका साकारणारा अभिनेता अनस रशिद त्याच्या खऱ्या आयुष्यात चांगला शिकलेला आहे. अनसने सायकॉलॉजी मध्ये मास्टर केले आहे. एवढेच नव्हे तर तो हिंदी इंग्लिश, पर्शियन आणि अरेबिक भाषा उत्कृष्टरित्या बोलतो.

हे वाचा – शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारबद्दल केलेला खुलासा वाचून तुम्हाला पण धक्का बसेल !

५) राम कपूर –
या यादीत टीव्ही इंडस्ट्रीमधील सुपरस्टार राम कपूर चे नाव सुद्धा आहे. राम कपूर हे उत्कृष्ट अभिनयासोबतच अभ्यासात सुद्धा अव्वल आहेत. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर राम कपुरने लॉस एंजलिस मधून अभिनयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले होते.

हे वाचा – लग्नाआधी अजय देवगन किंवा शाहरुख नव्हे तर हा अभिनेता होता काजोलचा क्रश !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *