Headlines

जाणून घ्या शक्ती कपूर यांच्या बद्दल अशा १० गोष्टी ज्या तुम्हाला आजतागायत माहीत नसतील !

बॉलीवूड चे खलनायक शक्ती कपूर ने चित्रपटांमध्ये वेगवेगळे रोल साकारले आहेत. ते त्यांच्या दमदार अभिनयाने कोणत्याही पात्रांमध्ये जीव आणतात. त्यावेळी ती पात्रे खरीखुरी आहेत असे भासू लागते. आज आम्ही तुम्हाला शक्ती कपूर बद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या आजपर्यंत तुम्हाला माहित नसतील.

१०) बॉलीवूड मध्ये जरी त्यांना शक्ती कपूर म्हणून ओळखले जात असले तरी त्यांचे खरे नाव वेगळेच आहे. शक्ती कपूर यांचे खरे नाव सुनील सिकंदर लाल कपूर असे आहे. मात्र त्यांच्यामते सुनील हे नाव दमदार नसल्याकारणाने त्यांनी ते बदलून शक्ती असे ठेवले.
९) शक्ती कपूर यांनी त्यांचे शिक्षण दिल्लीमधून पूर्ण केले होते. ते दिल्ली युनिव्हर्सिटी च्या किरोडीमल या कॉलेजमध्ये शिकायचे. शिवाय टीआईआई मधून त्यांनी अभिनयातील बारकावे शिकले.

८) शक्ती कपूर हे एका पंजाबी परिवारातील आहेत. त्यांचे वडील दिल्लीमधील कॉटन पॅलेसमध्ये टेलर चे दुकान चालवायचे. ७) शक्ती कपूर त्यांचा इंसानियत के दुश्मन हा चित्रपट त्यांच्या आई-वडिलांना दाखवण्यास घेऊन गेले होते. या चित्रपटात शक्ती कपूर यांनी एका मुलीचा बलात्कार केला होता हे दृश्य पाहून त्यांची आई त्यांच्यावर भडकली आणि सरळ सिनेमागृहाच्या बाहेर पडली. एवढेच नव्हे तर त्यांच्या वडिलांनी देखील त्यांना मारले. त्यांच्या वडिलांनी शक्ती कपूरनां विचारले की तू प्रत्येक चित्रपटात मुलींना छेडण्याची कामे करतोस का? कधीतरी चांगला रोल साकारत जा.
६) लहानपणापासूनच शक्ती कपूर यांना स्पोर्ट्स कारचे खूप वेळ होते. त्यामुळे स्पोर्ट्स कार वर खूप पैसा देखील खर्च करायचे. त्यानंतर अभिनेता जितेंद्र यांनी शक्ती कपूर यांना समजावले की उगीचच अनावश्यक गोष्टींमध्ये पैसा खर्च करीत जाऊ नकोस. त्या बदली प्रोपर्टी मध्ये पैसे इन्वेस्ट कर. यामुळे तुझे भविष्य सिक्युअर होईल. जितेंद्र यांच्या त्या सल्ल्यामुळे शक्ती कपूर यांच्याकडे आज तीन मोठे बंगले आहेत.

५) शक्ती कपूर बॉलीवूड चे डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांना खूप मानतात. शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे की जरी मिथुन चक्रवर्ती आणि मला कानाखाली मारली तरी मला त्याबद्दल वाईट वाटणार नाही. ४) शक्ती कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या बहिणी सोबत लग्न केले. शक्ती कपूर यांच्या पत्नीचे नाव शिवांगी कोल्हापुरे असे आहे. शक्ती कपूर यांनी शिवांगी सोबत किस्मत या चित्रपटांमध्ये काम केले होते. याच चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेम निर्माण होऊ लागले. त्यावेळी शक्ती कपूर यांनी शिवांगी ला इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या स्पोर्ट्स कार मधून फिरवायचे. त्यानंतर शिवांगी सुद्धा शक्ती कपूर वर प्रेम करू लागल्या.

३) सुरुवातीच्या काळात शक्ती कपूर यांनी भरपूर खलनायिकी भूमिका साकारल्या. मात्र सत्ते पे सत्ता या चित्रपटात त्यांनी एक विनोदी ढंगाचे पात्र साकारले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की ते कॉमेडी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यानंतर शक्ती कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी व्हिलनची भूमिका साकारली. २) शक्ती कपूर यांच्यावर १०० हून अधिक गाणी चित्रीत झाली आहेत. त्यांचा चेहरा एखाद्या हीरो प्रमाणेच असल्यामुळे त्यांनी मिथुन, गोविंदा आणि संजय दत्त यांसारखे अभिनेत्यांसोबत कित्येक गाण्यांमध्ये डान्स केला आहे.

१) शक्ती कपूर यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केले. मात्र त्यांना केवळ एकाच चित्रपटांसाठी फिल्मफेअर अवॉर्ड दिला गेला. त्यांना हा एकमेव फिल्मफेअर अवॉर्ड राजा बाबू या चित्रपटासाठी देण्यात आला होता.

हे वाचा –  सलमान, विराट किंवा सनी लियोनी नव्हे तर या अभिनेत्रीला केले जाते सर्वाधिक जागतिक सर्च !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *