Headlines

दिसायलाही तंदुरुस्त आणि पैश्याची पण नाही कमी, पण हे अभिनेते आहेत अश्या गंभीर आजारांनी त्रस्त !

बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे आपले लाडके आहेत. त्यांचा अभिनय, पेहराव, सौंदर्य, नृत्य, त्यांच्या सवयी अशा विविध कारणांमुळे त्यांचा चाहता वर्ग तयार होतो. हा चाहता वर्ग फक्त भारतातीलच नव्हे तर पूर्ण जगभरात आहे. बॉलिवूडमधील कलाकार आपला लुक आणि फिटनेस कायम ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतात. यासोबतच ते आपल्या चाहत्यांना देखील फिटनेस किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून देत असतात. मात्र, फिटनेसबाबत एवढे करूनही अनेक कलाकार धोकादायक आजारांनी ग्रस्त आहेत. चला जाणून घेऊया अशा काही कलाकारांविषयी जे असामान्य आजाराने ग्रस्त आहेत.

प्रियांका चोप्रा – बॉलिवूडमधील देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली प्रियांका चोप्रा आता अंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्री म्हणून तिने ओळख मिळवली आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणाऱ्या प्रियंका चोप्रा आजही खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहेत. जरी फार कमी लोकांना माहित असेल की प्रियांका एका गंभीर आजाराशी लढत आहे. 39 वर्षांची झालेल्या प्रियंकाला वयाच्या 5 व्या वर्षापासून दम्याचा त्रास आहे आणि तिने स्वत: हा खुलासा केला होता.

अमिताभ बच्चन – बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी आपला ७९ वा वाढदिवस साजरा केला. या वयातही अमिताभ बच्चन यांनी स्वतःला एकदम तंदुरुस्त ठेवलं आहे. सध्या, अमिताभ बच्चन टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करताना दिसत आहेत. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना यकृताशी संबंधित सिरोसिस नावाच्या घातक आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे यकृत केवळ २५ टक्के कार्य करते. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’ चित्रपटादरम्यान एक मोठा अपघात झाला होता आणि आजही ते त्या अपघातामुळे वेदनेमध्ये जगत आहेत.

सलमान खान – बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान त्याच्या लूक आणि फिटनेससाठी ओळखला जातो. तंदुरुस्त राहण्यासाठी सलमान खान दिवसातून किमान ४ तास जिममध्ये घालवतो. सलमान खानला बऱ्याच काळापासून Cetrigeminal Neuralgia नावाच्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे. असे म्हटले जाते की या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती जबडा आणि गालांमध्ये असह्य वेदनांनी त्रस्त असतात. कधीकधी पीडिताला आवाज किंवा दात घासल्यामुळे किंवा चेहऱ्यावरील मेकअपमुळे देखील वेदना होतात.

शाहरुख खान – किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता शाहरुख खान अनेकदा त्याच्या लूक आणि स्टाईलमुळे चर्चेत असतो. मात्र, शाहरुख खान बऱ्याच काळापासून पाठदुखीशी झुंज देत आहे. दिल से मधील चल छैया छैया या गाण्याच्या शूटिंगच्या काळापासून शाहरुख खान या समस्येला सामोरे जात आहे. शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की त्याने तब्बल पाच वेळा खांद्यावर शस्त्रक्रिया केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !