Headlines

३२ वर्षे एकमेकांपासून दूर राहूनही घेतला नाही घटस्फोट, बघा कोण आहेत ते !

बॉलीवूड मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य लोकांना अजूनही माहीत नाही. बॉलीवूड मध्ये एकत्र राहणारी जोडी एकमेकांसोबत किती आनंदी आहे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. यामध्ये तर श्रीमंत लोकांच्या बाबतीत आपण ठीक असा अंदाज लावू शकत नाही. असेच काहीसे आयुष्य बॉलीवूडमधील एक नामांकित जोडी जगत आहे आणि ती जोडी म्हणजे रणधीर कपूर आणि बबिता. म्हणजेत करिष्मा कपूर आणि करिना कपूर खान चे आई वडील. नक्की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे बत्तीस वर्षापासून करिष्मा व करीना यांचे आई-वडील एकमेकांपासून दूर आहेत.
८० च्या दशकानंतर रणधीर कपूर च्या करिअरला उतरती कळा लागली होती. यामुळे त्यांची लाईफ स्टाईल बिघडत गेली आणि त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर झाला. कपूर खानदान जितके त्यांच्या कामासाठी ओळखले जाते तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सर्वजण पटकन जोडले जातात. करिष्मा व करीना यांचे आई-वडील गेल्या १९ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहतात परंतु अजूनही त्यांनी एकमेकांना घटस्पोट दिलेला नाही.
राजकपूर यांचा मोठा मुलगा असलेले रणवीर कपूर एकेकाळी बॉलिवूडचा सुपरहिरो म्हणून मानले जायचे. परंतु त्यांची लव लाइफ तितकीशी यशस्वी ठरले नाही. ७० च्या दशकात रणधीर व बबिता यांच्या प्रेम कहानी सुरुवात झाली परंतु ही प्रेम कहाणी नेहमीच संकट व्याप्त अशी होती. बबिता व रणधीर यांची पहिली मुलाखत संगम या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी बबिता चे नाव टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जायचे परंतु कपूर खानदानात मात्र स्त्रियांना अभिनय करण्याची पाबंदी होती. रणधीर यांच्या सोबत लग्न झाल्यावर बबिताला त्यांच्या करिअरवर पाणी सोडावे लागले. त्यानंतर ८० च्या दशकानंतर रणधीरचेही करिअर फ्लॉप होत गेले. त्याच वेळी बबिता व रणधीर यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. त्यामुळेच वेगळे ते दोघे वेगवेगळे राहू लागले.
ज्यावेळेस करिष्मा कपूर चित्रपटांमध्ये काम करू इच्छित होते त्यावेळी तिला तिच्या घरच्यांनी काम करण्यास मनाई केली. परंतु बबिता ने तिच्या घरच्यांचा व पतीच्या विरोधात जाऊन करिश्माला चित्रपटांमध्ये काम करण्यास प्रोत्साहन दिले. साल 2000 मध्ये रणधीर व बबिता एकत्र आले परंतु त्यांच्यातील प्रेम पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकले नाही. रणधीर व बबिता यांच्या लग्नाला आता ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु फक्त त्यांच्या मुलींसाठी दोघांनी अजून पर्यंत घटस्पोट घेतला नाही. ते दोघे कार्यक्रम पार्टी मध्ये एकत्र येतात मात्र बाकीच्या वेळी ते वेगळे राहणे पसंत करतात. घटस्फोटाच्या बाबतीत रणधीर कपूरने एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की घटस्फोट घ्यायची गरजच काय? ना मी दुसरे लग्न करणार आहे किंवा ना ती दुसरे लग्न करणार आहे. ती माझ्या पद्धतीने राहू इच्छित नाही व मी तिच्या पद्धतीने राहू इच्छित नाही. परंतू तिने माझ्या दोन्ही मुलींचे पालन-पोषण व माझ्या परिवाराचा सांभाळ खूप चांगल्या पद्धतीने केला आहे.
रणधीर व बबिताने जीत, आज और कल यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. याव्यतिरिक्त रणधीर यांचे जवानी दिवानी, धरम करम, चाचा भतीजा, पोंगा पंडित, कसमे वादे, हिरालाल पन्नालाल, ढोंगी, हाथ की सफाई, रामपूर का लक्ष्मण, रमय्या वस्तावय्या आणि हाउसफुल सिरीज यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर बबिता यांनी फर्ज, हसीना मान जाएगी, किस्मत तुमसे अच्छा कौन है, अनजाना, डोली, राज, अनमोल मोती, एक हसीना दो दिवाने, बिखरे मोती, सोने के हात यांसारखे यशस्वी चित्रपटात काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *