Headlines

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांना हे खायला द्या !

लहान मुलांच्या विकासासाठी आणि त्यांच्या तल्लख बुद्धी साठी त्यांचे आई-वडील वेगवेगळे प्रयत्न करत असतात. जर एखादे मूल खेळ किंवा इतर ऍक्टिव्हिटी सोबतच अभ्यासात सुद्धा हुशार असेल तर पालकांचा अर्धा त्रास कमी होतो. सध्याचे युग हे खूपच जलद झाले आहे. त्यामुळे स्पर्धाही खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुलांना तल्लख बुद्धीची आवश्यकता असते. आणि ते असण्यासाठी खाणे-पिणे सुद्धा योग्यरितीने असणे आवश्यक आहे. सध्या बाजारात सुध्दा मूल हुशार व्हावीत यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. परंतु या औषधांना नैसर्गिक गोष्टींची सर नाही. चला तर मग जाणून घेऊ मुलांची आकलन शक्ती वाढवण्यासाठी त्यांना काय खायला द्यावे.

१. पालक – मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पालक फारच उपयुक्त असते. मेंदूतील रक्तवाहिन्या मजबूत बनवण्याचे पालक काम करते. पालक मध्ये एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणावर असते. जे फ्री रेडिकल्सला नष्टा करून स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.
२. अंडे – जर तुमचे मूल अंडे खाण्यास पसंत करत असेल तर त्याला ते रोज द्यावे. अंड्यामध्ये कोलिन नावाचा पौष्टिक घटक असतो. कोलिन हे असे पौष्टिक घटक आहे ज्यामुळे मेंदू द्वारे ग्रहण केली जाणारी कोणतीही माहिती जास्त काळ लक्षात ठेवण्यास मदत करते. मुलांची आकलन शक्ती चांगली होण्यासाठी त्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश असणे सर्वोत्तम.
३. अक्रोड – जास्त करून मुलांना अक्रोड खाणे आवडत नाही. परंतु स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी अक्रोड हा एक चांगला मार्ग आहे. अक्रोड खाण्यास मुले नाक मुरडत असतील तर कोणत्यातरी गोडधोड पदार्थात त्यांच्या नकळत अक्रोड घालून देऊ शकता. शिऱ्या मध्ये अक्रोड घालून दिल्यास मुले आवडीने खातात.
४. ओट्स – नाश्त्यामध्ये रोज ओट्स खाणाऱ्या या मुलांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. ओट्स खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे समतोल राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील पचनशक्ती सुद्धा वाढते. त्यामुळे मुलांना नाश्त्यामध्ये रोज खायला घालण्याचा प्रयत्न करावा.
५. ऍव्होकॅडो – मेंदूमध्ये रक्ताचा पुरवठा योग्य रीतीने होण्यासाठी ऍव्होकॅडोचा उपयोग होतो. ऍव्होकॅडोमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट असतात. त्यामुळे मुलांमधील हायपरटेन्शन ची समस्या दूर होतील.
६. हळद – हळदीचा वापर हा फक्त भाजी किंवा अन्य पदार्थाचा रंग आणि स्वाद वाढविण्यासाठी केला जात नाही तर हळदी मध्ये असलेले करक्युमिन मेंदूतील रक्तवाहिन्यांना जलद काम करण्यास मदत करते. त्याचप्रमाणे हळदी मध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडांट आणि अँटी इंफ्लेमेट्री चे गुण असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *