हि अभिनेत्री जेव्हा जन्मली तेव्हा सलमान होता ३३ वर्षाचा, तरीही चित्रपटात प्रेयसीची भूमिका, नाव पाहून धक्का बसेल !

632

शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारखे अनेक प्रसिद्ध अभिनेते आहेत. जे त्यांच्यापेक्षा फार कमी वय असलेल्या अभिनेत्रींसोबत मुख्य पात्र म्हणून काम केले आहे. त्यांनी स्वतःला इतकं फिट ठेवलं आहे की ते अजूनही चित्रपटांमध्ये अभिनय करताना आपल्याला तरुण वाटतात आणि अगदी कोणत्याही अभिनेत्रीसोबत मुख्य अभिनेत्याचा भूमिकेत ते शोभून दिसतात.

आज आपण हिंदी चित्रपट सृष्टीतील एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी सलमान खानपेक्षा वयाने खूप छोटी आहे परंतु तिने सलमान सोबत चित्रपटाच्या स्त्री पात्राच्या मुख्य भूमिकेत काम केले आहे. सलमान खान जेव्हा ३३ वर्षाचे होते तेव्हा या अभिनेत्रीचा जन्म झाला होता. तर या अभिनेत्रीचं नाव आहे सई मांजरेकर. सई मांजरेकर ही हिंदी चित्रपट सृष्टीतील नवीन नाव आहे.
सईने ‘दबंग ३’ या चित्रपटातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. ३३ वर्ष मोठे असलेल्या सलमान खानसोबत सईने या चित्रपटामध्ये मुख्य स्त्री अभिनेत्री पात्र साकारत रोमांस देखील केला आहे. सई आणि सलमान खान यांची जोडी प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडली.

हिंदी तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची सई ही मुलगी आहे. सईचा जन्म २९ ऑगस्ट १९९८ मध्ये झाला. आता सई २१ वर्षांची आहे. सलमान खानसोबत चित्रपटात काम केल्यानंतर सईला फार प्रसिद्धी मिळाली आहे. सई मांजरेकरांच्या चाहत्यांचे डोळे तिच्या येत्या चित्रपटातील अभिनयाकडे लागले आहेत. सध्या सई सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचत आहे. इंस्टाग्रामवर ती स्वतःचे अनेक सुंदर फोटोस देखील पोस्ट करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !