Headlines

या कारणामुळे करिष्मा कपूर ऐवजी ऐश्वर्यासोबत अभिषेक बच्चनने केलं लग्न, कारण जाणून थक्क व्हाल !

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक आयडियल जोडपे मानले जाते. दोघे ही लग्नानंतर खूप खुश आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे ही एकमेकांवर प्रेम करत स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडत सुखाने जीवन जगत आहेत. पण ऐश्वर्या सोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेक बच्चनला करिष्मा कपूर आवडत होती व तिच्याशी लग्न देखील होणार होते. परंतु त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. काय आहे यामागील नेमके कारण?

‘हा मैने भी प्यार किया’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे एकमेकांच्या अधिक जवळ आले. २००२ साली अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या परिवाराच्या संमतीने त्यांनी या दोघांचा साखरपुडा केला. दोन्ही कुटुंब ह्या साखरपुड्यामुळे फार आनंदात होती. परंतु करिष्मा कपूरचा निर्णय अभिषेक ला आवडला नव्हता.

माध्यमांमधील रिपोर्टनुसार, “करिष्मा ही लग्न झाल्यावर एकत्र कुटुंबामध्ये राहण्यास तयार नव्हती.” ती लग्नानंतर अभिषेक सोबत एका वेगळ्या घरांमध्ये राहू इच्छित होती आणि या गोष्टीसाठी ती अभिषेक वर दबाव देखील टाकत होती. परंतु घरच्यांपासून वेगळा अभिषेकला मंजूर नव्हतं.

अभिजितने करिश्माला खुप समजावले आणि जेव्हा गोष्ट समजण्याच्या पलीकडे गेल्यावर अभिषेकने हे नातं संपवण्याचा विचार केला. अभिषेक बच्चनचे आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम आहे आणि यामुळेच करिश्माच्या या गोष्टीला त्याने नकार दिला.


करिष्मा कपूरची आई बबिता हिला हे नातं मंजूर नव्हतं असंही बोललं जातं. त्यावेळेला करिष्मा ही आपल्या करिअरमध्ये खूपच कमावत होती तर दुसर्‍या बाजूस अभिषेकचे करियर हे नुकतेच सुरू झाले होते. एवढंच नव्हे तर त्यांची दुसरी मुलगी करीना कपूर सोबत चा अभिषेक चा पहिला चित्रपट “रिफ्यूजी” सुद्धा फ्लॉप झाला होता आणि अभिषेकचे एका मागून एक अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. बबीता यांना ही भिती होती की जर अभिषेक बच्चन यांना या चित्रपटसृष्टीमध्ये यश नाही मिळाले तर पुढे कसं होईल.

शेवटी करिष्मा हिला तिच्या आईचा निर्णय मान्य करून अभिषेक सोबतचे नाते तोडावे लागले. नंतर दोन्ही परिवारामध्ये मतभेद होऊन करिष्मा कपूरने संजय कपूर सोबत लग्न केले. हळूहळू अभिषेक बच्चन या तुटलेल्या आता मधून बाहेर येत असताना त्यांना मैत्रिणीचा रूपामध्ये ऐश्वर्या भेटली. २००० साली अभिषेक आणि ऐश्वर्या यांची पहिल्यांदा भेट झाली होती.

गुरुनानक चित्रपटाच्या सेटवर अभिषेक मे ऐश्वर्याला प्रपोज सुद्धा केले होते. त्यानंतर २००७ साली त्या दोघांनी लग्न केले. अभिषेक बच्चनची आई जया बच्चन यांना देखील ऐश्वर्या खूप आवडत होती. जया बच्चन यांना एक अशी हवी होती जिला पारिवारिक मूल्य आणि आपल्या संस्कृतीबद्दल माहिती असेल आई ऐश्वर्या मध्ये हे सर्व गुण त्यांना दिसत होते आणि त्यांनी अभिषेकला ऐश्वर्या सोबत लग्न करण्यासाठी परवानगी दिली. आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एक सुखी जीवन जगत आहेत आणि त्यांना एक गोड मुलगी सुद्धा आहे, तिचे नाव आराध्या आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *