Headlines

तुमच्या लग्न समारंभात या अभिनेत्रींना नाचवायचे असेल तर त्यांना द्यावे लागेल एवढे मानधन !

एखादा कलाकार म्हटलं की तो चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून त्याला मानधन मिळत असतं. परंतु इतर अनेक माध्यमांमधून देखील मानधन मिळवत असतात. जाहिराती, उदघाटन सोहळे व पाहुणे म्हणून एखाद्या कार्यक्रमाला भेट देणे इत्यादी माध्यमातून ते अधिक मानधन मिळवत असतात. या कलाकारांच्या ज्या काही फीस असतात त्या मिनिटांवर ठरवल्या जातात. त्याचसोबत या कलाकारांना लग्न व इतर मोठ्या समारंभांना बोलवले जाते व त्या कार्यक्रमांमध्ये ते कार्यक्रम देखील सादर करतात, या कार्यक्रमांसाठी देखील ते एक रक्कम निश्चित करतात.

वरील प्रत्येक समारंभ व कामासाठी त्यांची रक्कम ठरलेली असते. अनेक मोठ्या व्यक्तींच्या लग्न सोहळ्यांमध्ये व कार्यक्रमांमध्ये हे कलाकार कार्यक्रम सादर करीत असतात. जर का तुम्हाला देखील या कलाकारांना आपल्या लग्नामध्ये कार्यक्रमासाठी बोलवायचे असेल तर त्यांची ही माहीत असणे आवश्यक आहे, चला तर मग पाहूया कोण कोण आहेत या कलाकारांनी आणि त्यांचे मानधन.

1. सलमान खान – बॉलीवूडचा भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान हा कोणत्याही पार्टी किंवा लग्नसमारंभात कार्यक्रम सादर करण्यासाठी १ ते २ करोड इतके मानधन स्वीकारतो. आपल्या अभिनय कारकीर्दीव्यतिरिक्त, खान एक दूरदर्शन सादरकर्ता आहे आणि बीइंग ह्यूमन फाउंडेशन या चॅरिटीच्या माध्यमातून मानवतेला प्रोत्साहन देतो. शिवाय सलमान खानची चित्रपट निर्मिती कंपनी देखील आहे.
2. प्रियांका चोप्रा – बॉलिवूडमधील देसी गर्लला म्हणजेच प्रियांका चोप्राला तुमच्या लग्नात बोलावणं जरा महागात पडेल कारण ती बॉलीवूडमधील तसेच हॉलीवूडमधील देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रियांका ही लग्न समारंभांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी २ ते २.५ करोड इतके मानधन स्वीकारते.
3. अक्षय कुमार – बॉलीवूडमधील प्रसिद्ध व खिलाडी अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. सामाजिक कामात देखील अक्षय कुमार नेहमी अग्रेसर दिसतो. लग्न समारंभांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी जवळ जवळ १.५ करोड इतके मानधन स्वीकारतो.

4. कतरिना कैफ – वयाच्या चौदाव्या वर्षी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकून आपल्या मॉडलिंग करिअरला कतरिनाने सुरुवात केली. परदेशातून भारतात येत हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःचं स्थान तिने निर्माण केलं. चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन स्वीकारणाऱ्या यादीमध्ये कतरिनाला देखील गणलं जातं. कतरिना देखील लग्न समारंभामध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी २.५ करोड रुपये मानधन स्वीकारते.
5. दीपिका पादुकोण – दीपिका बॉलीवूडमधील एक एक सुंदर व सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. वेगवेगळ्या व नाजूक विषय असलेल्या चित्रपटांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. दीपिका कोणत्याही लग्न समारंभांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी १ करोड इतके मानधन स्वीकारते.

6. ह्रितिक रोशन – बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांतील गाण्यांवर जबरदस्त नृत्य सादर करणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे ह्रितिक रोशन. बॉलीवूडमधील अनेक गाण्यांवर अप्रतिम असे नृत्य सादर करणारा ह्रितिक लग्न समारंभांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी २.५ करोड इतके मानधन स्वीकारतो.
7. करीना कपूर खान – बॉलीवूडची बेबो करीना कपूर ही पार्टीमध्ये जाण्यासाठी ६० लाख तर लग्न समारंभांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी १.५ करोड इतके मानधन स्वीकारते. अभिनेत्री व्यतिरिक्त करीना एक डिझायनर देखील आहे. करीना ही एक अशी एकमेव अभिनेत्री आहे जिने महिलांसाठी पहिली फॅशन लाईन लॉन्च केली.

8. शाहरुख़ खान – बॉलीवूडचा किंग खान असलेल्या शाहरुखचं मानधन देखील एका किंगसारखं आहे. खान पार्टी व लग्न समारंभांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी तब्बल ३ ते ४ करोड इतके मानधन स्वीकारतो. सोबतच शाहरुखच्या नियमांप्रमाणे तो वर्षातून फक्त १० कार्यक्रम सादर करतो.

9. सिद्धार्थ मल्होत्रा – स्टुडेन्ट ऑफ द ईयर या चित्रपटातून सर्वांचा पसंतीस पडलेला कलाकार म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. सोबतच माय नेम इज खान या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील सिद्धार्थने काम केले आहे. सिद्धार्थ लग्न समारंभांमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी २० ते २५ लाख इतके मानधन स्वीकारतो.
10. सैफ अली खान – हम साथ साथ है या चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सैफ अली खान ने त्यानंतर अनेक चित्रपट डेट प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. सैफ लग्न समारंभात कार्यक्रम सादर करण्यासाठी १ करोड इतके मानधन स्वीकारतो तर उदघाटन सोहळ्यासाठी ८० लाख इतके मानधन आकारतो.

11. सनी लियॉन – करणजीत कौर वोहरा हे सनी लियॉनचे खरे नाव असून ती एक मॉडेल व अभिनेत्री असून ती एक पॉ*र्न*स्टा*र देखीलं आहे. सनी लियॉन ही अर्ध्या तासांचा नृत्यासाठी ती जवळ जवळ २३-४० लाख इतके मानधन स्वीकारते.
12. रणवीर सिंह – बाजीराव पेशवा, अल्लाउद्दीन खिल्जी ही दोन टोकाची पत्रे लिलया पेलत अनेक उत्तमोत्तम पात्र रंगवत रणवीर सर्वांचा लाडका अभिनेता ठरला आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारा अभिनेता तो आता झाला आहे. रणवीर लग्न समारंभामध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी १ ते १.५ करोड इतके मानधन स्वीकारतो.