Headlines

हे आहेत भारतातील सुंदर न्युज अँकरचे रियल लाइफ पती, नंबर ३ चा तर पती आहे आईपीएस अधिकारी !

सौंदर्य आणि ग्लॅमर आता फक्त फिल्म इंडस्ट्री पुरते सीमित राहिले नाही. आता असे अनेक क्षेत्र निर्माण झाले आहेत जेथे महिला सौंदर्या सोबतच बुद्धिमान देखील असतात. आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या जोरावर त्या खूप प्रसिद्धी मिळवतात. राजकारण असो किंवा क्रीडा क्षेत्र महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. मात्र आज या पोस्टमध्ये आपण मीडिया विश्वातील महिलांबद्दल बोलणार आहोत.

न्यूज चॅनेल्सवर अशा अनेक वृत्तनिवेदिका आहेत ज्या सुंदर असण्यासोबतच खूप बुद्धिमान देखील आहेत. या महिला एकट्याच अनेकांना पुरेशा पडतात. या वृत्त निवेदिकांच्या सौंदर्या पुढे बॉलीवूड मधील हीरोइन सुद्धा फिक्या पडतात. त्यामुळे या वृत्तनिवेदिकांना ब्युटी विथ ब्रेन हा किताब दिल्यास काही हरकत नाही.

मात्र या आजच्या पोस्टमधून आम्ही तुम्हाला या सुंदर वृत्तनिवेदिकां बद्दल नाहीतर त्यांच्या पतींची माहिती देणार आहोत. तुम्हीपण जाणून घ्या तुमच्या आवडत्या वृत्त निवेदिकांचे पती काय करतात व कोण आहे.

1. रुबिका लियाकत – रुबिका लियाकत ही झी न्यूज ची सुंदर वृत्त निवेदिका आहे. रुबिका ताल ठोक के हा कार्यक्रम करते व या कार्यक्रमात समोर असलेल्या पेनलिस्ट ची बोलती बंद करते. याआधीही रुबिका ने अनेक मोठ्या न्यूज चैनल सोबत काम केले आहे. रुबिका लियाकत ने २०१२ मध्ये नावेद कुरैशी सोबत लग्न केले. तिचे पती देखील एक नामांकित पत्रकार आहेत.
2. श्वेता सिंह – श्वेता सिंह ही भारतातील एक प्रसिद्ध आणि सुंदर वृत्तनिवेदिकां पैकी एक आहे. सध्या ती ‘आज तक’ चैनल ची अँकर आणि एक्झिक्यूटिव्ह एडिटर आहे. श्वेता सिंहची लोकप्रियता इतकी आहे की ती द कपिल शर्मा शो मध्ये सुद्धा येऊन गेली. अनेक वर्षांपासून आज तक वर काम करत आहे. श्वेता सिंह आता ४१ वर्षांची आहे मात्र तिच्या सौंदर्यामुळे तिच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही. श्वेताचे लग्न संकेत कोतकरशी झाले आहे. संकेत एनलाइटा सोल्युशन्स येथे उच्च पदावर कार्यरत आहेत.
3. अंजना ओम कश्यप – अंजना ओम कश्यप चे नाव सुद्धा भारतातील सुंदर व बुद्धिमान वृत्त निवेदिकांमध्ये येते. अंजनाच्या बोलण्याची पद्धत लोकांना खूप आवडते. अंजनाला कित्येकदा सर्वोत्कृष्ट न्यूज अँकर चा पुरस्कार मिळाला आहे. अंजना आता ४४ वर्षांची आहे. अंजना सुद्धा अनेक वर्षांपासून आज तकशी जोडली गेली आहे. आज तक आधी तिने अनेक न्यूज चॅनेल मध्ये काम केले होते. अंजनाच्या पतीचे नाव मंगेश कश्यप असे आहे ते पेशाने आयपीएस अधिकारी आहे.
4. नेहा पंत – या यादीत शेवटचे नाव येते ते म्हणजे अँकर नेहा पंतचे. नेहाने गेली सात वर्षे एबीपी न्यूज सोबत काम केले होते. सध्या ती न्यूज १८ सोबत काम करत आहे. न्यूज १८ वर नेहा डिबेट शो हम तो पूछेंगे मध्ये काम करते. या शोने तिला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली. नेहा पंतच्या पतीचे नाव मयंक पंत असे आहे. नेहा आणि मयंक चे लग्न २०१५ मध्ये झाले. मयंक वोडाफोन कंपनी मध्ये जनरल असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !