Headlines

गॅस सिलेंडर घ्यायचाय तर आत्ताच करा हे काम, १ नोव्हेंबर पासून बदलणार आहेत नियम !

पूर्वी घरात चूल पेटवून अन्न शिजवले जायचे. मात्र काळानुरूप हळूहळू त्या चुलीची जागा गॅस शेगडी ने घेतली. मात्र आजही काही खेडेगावात चुलीवरच जेवण शिजते. प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर येतात त्यास काही नियम असतात हेच नियम १ नोव्हेंबरपासून थोडे बदलण्यात आले आहेत.

१ नोव्हेंबरपासून गॅस डिलिव्हरी साठी नवीन सिस्टीम लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तेल कंपन्यांनी ही व्यवस्था देशातील १०० शहरात लागू केली आहे. या सिस्टीम मध्ये ग्राहकांना सिलेंडरची डिलिव्हरी घेण्यापूर्वी एक ओटीपी सांगावा लागेल. सिलेंडर वापरकर्त्यांना गॅस बुक करते वेळी त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी चा मेसेज येईल.

जेव्हा डिलिव्हरी बॉय सिलेंडरची डिलिव्हरी घेऊन येईल त्यावेळेस त्याला तो मोबाईल वरील ओटीपी सांगावा लागेल. त्यानंतर तो डिलिव्हरी बॉय तो ओटीपी नंबर कंपनीला पाठवेल. तेथून प्रत्युत्तर आल्यावरच तुम्हाला सिलेंडर मिळेल.
ही व्यवस्था देशातील १०० स्मार्ट सिटी मध्ये १ नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती सध्या वापरकर्त्यांना पाठवण्याचे काम चालू आहे. ज्या ग्राहकांचे नंबर बंद येत आहेत त्यांना त्यांचे नंबर अपडेट करण्यास सांगितले आहेत. जेणेकरून ग्राहकांना येणाऱ्या काळात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागू नये. ही संपूर्ण व्यवस्था सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी होत आहे.

मोबाईल द्वारे गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर एजन्सी संचालक द्वारा उपभोक्त्याला रिसीट प्रिंट करतेवेळी एक ओटीपी त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल. जेव्हा सिलेंडर डिलिव्हरी बॉय सिलेंडर घेऊन येईल त्यावेळी त्याला त्याच्या मोबाईल मधून कंपनीच्या एप्लीकेशन मध्ये ग्राहक सांगतील तो ओटीपी भरावा लागेल.
त्यानंतरच गॅस डिलिव्हरी करता येईल. अशातच जर ज्या उपभोक्त्यांचे नंबर गॅस कनेक्शन मध्ये अपडेट नसतील त्यांना ते तातडीने अपडेट करावे लागतील.

अधिकांश ग्राहकांचे जुने गॅस कनेक्शन घेतले आहेत. ज्यात त्यांच्याकडून त्यांचे लँडलाईन क्रमांक नोंदवण्यात आले आहेत. किंवा काहींचे मोबाईल क्रमांक बंद झाले आहे. त्यामुळे या नवीन सिस्टीम साठी प्रत्येकाने त्यांचे मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !