Headlines

वयाने कमी आणि सुंदर असून देखील या अभिनेत्री साकारतात आईची भूमिका !

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाने जास्त असून देखील चित्रपटात तरूण दिसतात. परंतु यांना अपवाद म्हणून अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या वयाने कमी असून देखील चित्रपटाच्या पडद्यावर वयस्कर दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच अभिनेत्रींची माहिती देणार आहोत ज्या वयाने कमी असून देखील चित्रपटांमध्ये वयस्कर पात्राची भूमिका करतात. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र त्या खूप सुंदर देखील दिसतात.

१) मेहेर विज – २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा बजरंगी भाईजान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्यावेळी सुपरहीट ठरला होता. या चित्रपटात मुन्नीच्या आईचे पात्र निभावणारी मेहेर विज तर सगळ्यांच्या लक्षात असेल. बजरंगी भाईजान या चित्रपटात जरी मेहेरने मुन्नी च्या आईचे पात्र निभावले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती खूप सुंदर आहे.
२) अमृता सुभाष – २०१९ मध्ये आलेल्या रणवीर सिंहच्या गली बॉय या चित्रपटात रणवीर च्या आईचे पात्र निभावणारी अमृता सुभाष ही मराठमोळी अभिनेत्री तर सर्वांना ठाऊकच आहे. गली बॉय या चित्रपटात जरी अमृताने रणवीर सारख्या मोठ्या मुलाच्या आईचे पात्र निभावले असले तरीही खऱ्या आयुष्यात मात्र ती फारच सुंदर व ग्लॅमरस आहे. गली बॉय सोबतच अमृताने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित सॅक्रेड गेम टू या वेबसीरीज मध्ये सुद्धा काम केले होते.

३) नादिया – नादिया ने साउथ कडील बऱ्याच चित्रपटात आईची भूमिका निभावली आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या मिर्ची या चित्रपटात नादिया ने प्रभास च्या आईचे पात्र साकारले होते. मात्र खऱ्या आयुष्यात ती फार देखणी व तरुण आहे.

४) राम्या कृष्णन – राम्या कृष्णन ने साऊथ सोबतच बॉलीवूड मध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम्याने बाहुबली या सुपरहिट चित्रपटात प्रभास च्या आईची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस आली होती. या चित्रपटात जरी राम्याने प्रभास च्या आईची भूमिका साकारली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ती खूप सुंदर आहे.
५) अर्चना जोईस – अर्चनाने केजीएफ या चित्रपटात आईची भूमिका साकारली होती. मात्र खऱ्या आयुष्यात ती फारच सुंदर दिसते. शिवाय तिचे वयही खूप कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *