सिने इंडस्ट्रीतले झगमगते तारे म्हणजेच बॉलीवूड कलाकार चित्रपटांव्यतिरिक्त काही अन्य मार्गाने देखील कमाई करतात. या सिनेकलाकारांचे कमाई करण्याचे जाहिरात, सोशल मीडिया, मॉडेलिंग यांसारखे अनेक मार्ग आहेत. एवढेच नव्हे तर हे कलाकार बिझनेस करून पण करोडो रुपये कमावतात. यामध्ये बॉलिवूडमधील काही लोकप्रिय कलाकार नामांकित कंपनीचे मालक आहेत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे अशाच काही नामांकित कंपन्यांचे मालक असलेल्या बॉलिवूड कलाकारांबद्दल माहिती देणारा आहोत.
१) सलमान खान – बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान त्याचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर करोड रुपये कमावतो शिवाय चित्रपटात काम करण्यासाठी किंवा मालिकांमध्ये सूत्रसंचालन करण्यासाठी करोडो रुपयांची फि आकारतो. एवढेच नव्हे तर त्याचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. ज्याद्वारे तो पैशांची कमाई करत असतो. बॉलीवूडचा भाईजान असलेल्या सलमान खानची बिंग ह्यूमन या नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये जिम मध्ये वापरले जाणारे साहित्य तसेच सायकल यांसारख्या गोष्टींची निर्मिती करते.
२) शाहरुख खान – बॉलीवूडचा किंग खान असलेल्या शाहरुख खानचा गेल्या वर्षभरात एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. परंतु असे असून सुद्धा शाहरुख ला पैशांची कमी भासत नाही. याचे कारण म्हणजे शाहरुख खान एस आर के मोशनल पिक्चर प्रोडक्शन कंपनी ‘रेड चिली’ एंटरटेनमेंट चा अध्यक्ष आहे. याशिवाय क्रिकेट मध्ये आयपीएलच्या कोलकत्ता नाइट रायडर्स या संघाचा तो मालक देखील आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या मार्गाने शाहरुख पैसे कमावत असतो.
३) अमीर खान – बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या अमीर खान चे स्वतःचे प्रॉडक्शन हाउस आहे. या प्रोडक्शन हाऊस चे नाव अमीर खान प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊस द्वारे वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती करून आमीर खान पैसे कमावत असतो.
४) ऋतिक रोशन – ऋतिक रोशन एचआरएक्स स्पोर्ट्स वेअर या कंपनीचा मालक आहे. यामध्ये खेळांची निगडीत सामानाची निर्मिती केली जाते. ही कंपनी बाजारात प्रचंड लोकप्रिय आहे.
५) जॉन अब्राहम – जॉन अब्राहम त्याच्या हँडसम आणि कूल लूक मुळे प्रसिद्ध आहे. तो स्वतःला नेहमी फिट ठेवणे पसंत करतो. ज्याप्रमाणे बॉलिवुडमध्ये त्याचे चित्रपट भरघोस कमाई करत असतात. त्याच प्रमाणे जॉन त्याच्या जे एच या प्रोडक्शन हाऊस द्वारे पैसा कमावत असतो. याशिवाय ज्यांची स्वतःची एक जिम सुद्धा आहे.
६) अक्षय कुमार – बॉलिवूडचा खिलाडी ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारचे हरिओम इंटरमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. याशिवाय अक्षय कुमार वेगवेगळ्या मोठ्या नामांकित ब्रँड सोबत जोडला गेलेला आहे. ज्याद्वारे तो करोडो रुपयांची कमाई करत असतो.
७) अजय देवगन – बॉलीवुडच्या सिंघमने अर्थात अजय देवगनने रोहा ग्रुप सोबत 25 करोड रुपयांच्या प्लांटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. शिवाय अजय चा स्वतःचा vfx स्टडियो आणि प्रोडक्शन हाऊस आहे.
हे बॉलीवूड कलाकार त्यांच्या कमाईतील काही हिस्सा समाजात दान सुद्धा करतात. सलमान खान पासून ते शाहरुख खान जॉन अब्राहम अक्षय कुमार यांसारखे अनेक कलाकार देशातील तसेच विदेशातील नागरिकांना सुद्धा मदत करीत असतात.
Bollywood Updates On Just One Click