साऊथ कडील हे सुपरस्टार संपत्तीच्या बाबतीत अंबानीला सुध्दा देतात टक्कर !

bollyreport
2 Min Read

संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये बॉलीवूड इंडस्ट्री ही सर्वात मोठी मानली जाते. येथे रोज नवीन चेहरे पाहण्यास मिळतात. मात्र हे सगळेच नवे चेहरे यशस्वी होतातच असे नाही. यामध्ये अधिक तर जे कलाकार सुरुवातीपासूनच श्रीमंत असतात तेच पुढे सुपरस्टार होऊ शकतात. तसेच त्यांनाच जास्त करोडपती बनण्याची संधी मिळते. बॉलिवूड सोबतच साउथ इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एकाहून एक सरस अभिनेते आहेत.
सध्या साउथ कडील अभिनेत्यांचे सुद्धा संपूर्ण जगभर प्रसिद्धी पाहण्यास मिळते. त्यामुळे साऊथ कडील अभिनेते हे बॉलीवुड पेक्षा कमी नाही असे म्हणण्यास हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला साऊथ कडील काही श्रीमंत अभिनेत्यांबद्दल माहिती देणार आहोत.
१) थलापती विजय –
साउथ कडील अभिनेता विजय बद्दल तर आपण सर्वच जाणतो. विजय प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. विजयने साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले ज्यामुळे एक अभिनेता म्हणून त्याची प्रसिद्धी खूप वाढली. विजयला साउथ मध्ये थलापती या नावाने ओळखतात. विजयने आतापर्यंत ६० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्याद्वारे तो २०० करोड रुपयांच्या संपत्तीचा मालक बनला आहे.
२) महेश बाबू –
साउथ इंडस्ट्रीमधील महेश बाबूला कोण ओळखत नाही असे होऊच शकत नाही. महेश बाबू हा साउथ इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. साउथ इंडस्ट्रीमध्ये महेश बाबु बालपणापासून काम करत आहेत. आतापर्यंत महेश बाबू ने २५ चित्रपटांमध्ये काम केले असून त्याची संपत्ती १३५ करोड रुपये इतकी आहे.
३) ज्युनिअर एनटीआर –
ज्युनिअर एनटीआर ला त्याच्या जबरदस्त लुक मुळे ओळखले जाते. त्यानेसुद्धा साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक मोठमोठे चित्रपट दिले आहेत. जूनियर एनटीआर साउथ कडील चित्रपटात अधिकतर ॲक्शन हिरो म्हणून काम करतो. जूनियर एनटीआर च्या अनेक पिढ्या साउथ इंडस्ट्रीवर राज्य करीत असल्यामुळे सध्या त्याच्याकडे ३८३ करोड रुपयांची संपत्ती आहे.

४) चिरंजीवी –

साऊथ कडील अभिनेता चिरंजीवीने आतापर्यंत १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. चिरंजीवी हा साऊथ मधील सगळ्यात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्याकडे तब्बल १५०० करोडो रुपयांची संपत्ती आहे.
तुम्हाला हा लेख आवडला असल्यास तुमच्या मित्रांसोबत हा नक्कीच शेअर करा व लाईक करा.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.